शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत विद्युत तारांनी घेतला वाघिणीचा बळी, मृतदेह कुजलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 12:07 IST

द्रावती तालुक्यातील चालबर्डी (कोंढा) शिव परिसरातील रस्त्यालगत एका वाघिणीचा कुजलेल्या स्थितीत सोमवारी मृतदेह आढळून आला. तिचा मृत्यू जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

ठळक मुद्देभद्रावती तालुक्यातील चालबर्डी शिवारातील घटना

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील चालबर्डी (कोंढा) शिव रस्त्यालगत एका वाघिणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या वाघिणीचामृत्यू शेतात लावलेल्या जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

मृत वाघिणीचे वय अंदाजे चार वर्ष आहे. शरीर थोडेफार कुजले असले तरी तिचे अवयव सर्व शाबूत आहेत. तिचा मृत्यू दोन ते तीन दिवसापूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. शेतातील जिवंत तारांच्या स्पर्शाने तिचा मृत्यू झाला असावा, यानंतर तिचा मृतदेह शिव रस्त्यालगत टाकण्यात आला असावा, असा संशय वनपरिक्षेत्र अधिकारी एच. पी. शेंडे यांनी व्यक्त केला आहे. वाघिणीचे शवविच्छेदन ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी केले. घटनास्थळी विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे, सहायक वनरक्षक निकिता चोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी एच. पी. शेंडे, इको प्रोचे बंडू धोत्रे उपस्थित होते.

वनविभागाकडून शोध

वाघिणीचा मृत्यू विद्युत स्पर्शाने झाल्याचे घटनास्थळावरून दिसून येते. या अनुषंगाने वनविभाग तपास करीत आहे. दोन दिवसापूर्वी मांगली शेतशिवारात शेतात लावलेल्या विद्युत प्रवाहाने चितळाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याला अटक करण्यात आली होती.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यू