शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वाघिणीने एक तास अडविला नागभीड-ब्रह्मपुरी मार्ग; दोन्ही बाजूला वाहनांची लांबलचक रांग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 12:37 IST

वाघिणीसोबत बछड्यांचाही मुक्त संचार : तासभर वाहतूक खोळंबली

दत्तात्रय दलाल

ब्रम्हपुरी (चंद्रपूर) : सायगाटा जंगल परिसरात वाघिणीने बछड्यांना जन्म दिला असून रस्ता पार करताना अनेकांनी तिघांना बघितले. सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान वाघीण रस्ता पार करून वारंवार जात होती. तर तिच्या मागे बछडे ये - जा करीत होते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने वाहनांची रांग लागली होती. तब्बल अर्धा - पाऊण तास वाहतूक विस्कळीत झाली. वनविभाग तसेच पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाल्यानंतर ट्रॅकरच्या सहाय्याने वनविभागाने वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवले त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

ब्रम्हपुरीपासून अवघ्या पाच किमी अंतरावरील सायगाटा परिसर जंगलाने व्यापला आहे. याच परिसरात एका इसमाचा बळी गेला होता. तेव्हापासून मारुती मंदिराकडे जाणारा रस्ता कठडे लावून बंद करण्यात आला आहे. या परिसरात नेहमीच वन्य प्राण्यांचा वावर असतो. सध्या या परिसरात अस्वल असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आज वाघीण बछड्यांसह रस्ता पार करताना दिसून आल्याने परिसरात दहशत निर्माण झाली. वनविभागाला माहिती मिळताच रस्त्यावर गस्त वाढविण्यात आली. कोणतीही जीवित हनी होऊ नये यासाठी पोलिस विभागाला पाचारण करण्यात आले. सायंकाळी तब्बल तासभर वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागला.

दुचाकी चालकाची वाघिणीला धडक

सकाळी १० ते ११ वाजताच्या दरम्यान दुचाकी चालक ब्रम्हपुरीकडे येत असताना वाघीण बछड्याला तोंडात पकडून रस्ता पार करत होती. अचानक समोर आल्याने दुचाकीची वाघिणीच्या मागील पायाला धडक बसली. यात दुचाकी चालक खाली पडला. मात्र, बछडा असल्याने वाघीण जंगलात निघून गेल्याची माहिती मिळाली आहे.

टोल नाका चालकाची मग्रुरी

सायंकाळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली होती. तब्बल अर्धा - पाऊण तासाने ही वाहतूक सुरू झाली. यावेळी गर्दी पाहून टोल चालकाने दोन्ही बाजूची वाहतूक सुरू ठेवणे आवश्यक होते. मात्र, एकच बाजू सुरू ठेवल्याने नाक्यावर देखील वाहनांची मोठी रांग लागली होती.

टॅग्स :Tigerवाघchandrapur-acचंद्रपूर