शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमुळे ताडोबातील पर्यटकांमध्ये कुतूहलपूर्ण चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 14:33 IST

मागील काही दिवसांपासून चार वाघ रस्त्याने जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला झाला. मात्र तो नेमका कुठचा आहे याचे कुतुहल पर्यटकांना लागलेले असून ते जाणून घेण्याचा खटाटोपही सुरू असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देतो रस्ता रहस्यमयवाघ चंद्रपूर जिल्ह्यातीलच

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : व्याघ्र दर्शनाची इच्छा झाली की विदर्भातील जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प डोळ्यासमोर उभा राहतो. दररोज ताडोबासाठी पर्यटकांची रिघ लागलेली असते. याचेच हे द्योतक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबाशिवायही वाघाचे दर्शन केव्हा कुठे होईल याचा नेम नाही. मागील काही दिवसांपासून चार वाघ रस्त्याने जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला झाला. हा व्हिडिओे बघितल्यास तो चंद्रपूर जिल्ह्यातीलच आहे हे स्पष्ट होते. मात्र तो नेमका कुठचा आहे याचे कुतुहल पर्यटकांना लागलेले असून ते जाणून घेण्याचा खटाटोपही सुरू असल्याचे दिसून येते.एक मिनी ट्रॅव्हल्स गुळगुळीत डांबरी रस्त्याने जात असताना चालकाचे अचानक पुढ्यात असलेल्या वाघांवर लक्ष जाते. यानंतर तो तिथेच ट्रॅव्हल्स थांबवितो. बघतो तर एक दोन नव्हे, तर तब्बल चार वाघ ऐटित ट्रॅव्हल्सकडे येत आहेत. हे बघून ट्रॅव्हल्समधील एका प्रवाश्याने आपल्या मोबाईलद्वारे वाघाचे चित्रिकरण सुरू केले. हे चित्रिकरण अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवर व्हायरल झाले आहे. चित्रिकरण बघितल्यास ते चारही वाघ एकापाठोपाठ ट्रॅव्हल्सच्या दिशेने येत आहेत. ते अगदी ट्रॅव्हल्सच्या बाजूने पुढे निघून जातात. ट्रॅव्हल्समधील मंडळीही अतिशय जवळून मनसोक्तपणे व्याघ्र दर्शन घेतात. यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. हा व्हिडिओे समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून अनेकांना या वाघाबद्दल कुतुहल निर्माण झाले आहे. एकाचवेळी चार वाघ तेही ताडोबाव्यतिरिक्त यामुळे अनेकजण हा परिसर कोणता आहे याची विचारपूस करताना दिसून येत आहे. काहींनी तर चंद्रपूर-मूल मार्गावर हे व्याघ्र दर्शन झाल्याची कमेंट्स पोस्ट केली आहे. त्या ट्रॅव्हल्समधून चित्रिकरण करताना गाडीत असलेले पॉलिथीन त्यात आले आहे. त्यावर वरोरा असे लिहिलेले आहे. यावरून हे वाघ चंद्रपूर जिल्ह्यातीलच आहे, हे स्पष्ट होते. मात्र तो रस्ता नेमका कोणता ही बाब चर्चेचा विषय बनली आहे.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प