शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

वाघ, बिबट्याच्या दहशतीमुळे उडाली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 9:53 PM

कोठारी गावात मागील पंधरा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून तीन जणांना जखमी केले आहे. तर आनंद नगरातील कस्तुरे यांच्या सात कोंबड्यावर ताव मारला आहे. तसेच तीन मोकाट कुत्र्यांवर हल्ला करून फस्त केले आहे.

ठळक मुद्देवाघाच्या हल्ल्यात तीन जनावरे ठार : बिबट्याने सात कोंबड्या केल्या फस्त

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : कोठारी गावात मागील पंधरा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून तीन जणांना जखमी केले आहे. तर आनंद नगरातील कस्तुरे यांच्या सात कोंबड्यावर ताव मारला आहे. तसेच तीन मोकाट कुत्र्यांवर हल्ला करून फस्त केले आहे. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने दोन पिंजरे लावले असून पंधरा कॅमेरे ठिकठिकाणी लावून हालचाल टिपण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र बिबटाने वनविभागाला गुंगारा देत तो कॅमेरातही आला नाही व पिंजऱ्याजवळ फिरकला नाही.एकूण बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांची झोप उडाली आहे.बिबटाने गावात प्रवेश करू नये, यासाठी सौर उर्जेवरील व बॅटरीवरील करंट तार जंगल हद्दीत लावलेले आहेत. मात्र बिबट्याच्या हालचाली व जंगल शेजारच्या घराजवळ दररोज नागरिकांना बिबट दर्शन देत आहे. रविवारला आंनदनगर येथील कस्तुरे यांच्या घरी जावून सात कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या. त्यामुळे गावकºयात कमालीची दहशत पसरली असून संध्याकाळी ६ नंतर रस्ते ओस पडलेले असतात व गावकºयांनी घराबाहेर जाणे बंद केल्याचे दिसून येत आहे. वनविभागाचे कर्मचारी दिवसरात्र कवडजई - कोठारी रस्त्यावर गस्त करीत आहेत.कोठारी बामणी, काटवली, पळसगाव, हरणपायली, आमडी व कळमना शिवारात नदीपात्राच्या तसेच कोठारी नाल्याच्या लगत वाघाने दहशत निर्माण केली असून चार जणांवरांना शेतात ठार केले आहे. शिवारात व नदीच्या पट्टयात वाघाला अनेक शेतकऱ्यांनी व नदीत मच्छिमारांनी बघितले आहे. या भागात वाघाने बस्तान मांडले असून दिवसरात्र शेतात फिरताना दिसून येत आहे. वाघाच्या सततच्या भ्रमंतीने शेतकºयात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या भीतीपोटी शेतकऱ्यांनी रात्रीची जागल बंद केली आहे. उभ्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतात रात्री जावे लागते. वीज वितरण कंपनीने रात्रीची लोडशेडींग बंद केल्याने दिवसा पिकांना पाणी करणे शक्य नाही. परिणामी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.वाघाला जेरबंद करण्याची मागणीशिवारात सतत फिरणाऱ्या वाघामुळे शेतकरी दहशतीखाली असून त्याचा विपरित परिणाम शेतमालावर होत आहे. शेतातील जनावरांवर हल्ले होत असून बैलांना ठार करीत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून वनविभागाने वाघाला जेरबंद करण्याची मागणी डॉ. देवानंद गुरू, दीपक लोहे, वासुदेव खाडे, संतोष इटनकर यांनी करीत ठार झालेल्या जनावरांबाबत त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.कोठारी गावात बिबट्याने दहशत निर्माण केली असून यात तीन जण जखमी झाले आहेत. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभाग सतत प्रयत्न करीत असून यंत्रणा अविरत काम करीत आहे. बिबट्याच्या हालचालीवर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तसेच कोठरी परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याचे व जनावरांवर हल्ला करून शिवारात भ्रमंती करीत असल्याचे समजले. त्यावर योग्य उपाययोजना करण्यात येणार आहे.- गजेंद्र हिरे,उपवनसंरक्षक, मध्यचांदा वनविभाग, चंद्रपूर.