शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

चंद्रपूर जिल्ह्यातील सात गावांमध्ये चार महिन्यांपासून वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 15:59 IST

चिमूर तालूक्यातील व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी पळसगाव, खडसंगी व चिमूर बफर वनपरिक्षेत्रातील सात गावात मागील तीन ते चार महिन्यांपासून शर्मिली नावाच्या वाघिणीसह तिच्या तीन बछड्यांनी अक्षरश: धूमाकूळ घालून चांगलीच दहशत माजवली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी कशी करावी शेती? शर्मिला वाघिणीने घेतले पाच बळी

प्रकाश पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चिमूर तालूक्यातील व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी पळसगाव, खडसंगी व चिमूर बफर वनपरिक्षेत्रातील सात गावात मागील तीन ते चार महिन्यांपासून शर्मिली नावाच्या वाघिणीसह तिच्या तीन बछड्यांनी अक्षरश: धूमाकूळ घालून चांगलीच दहशत माजवली आहे. या वाघिणीने आतापर्यत पाच जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे मासळ परिसरातील सातही गावातील नागरिक शेती कशी करायची या विवंचनेत आहेत. त्यांचा वनविभागप्रति रोषही वाढला आहे.सध्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशात व संपूर्ण राज्यात सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली होती. याला आता हळूहळू तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. आता लॉकडाऊनमधे थोडीफार शिथिलता दिल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब जनता आपले जनजीवन रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.चिमूर तालुक्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. आता मृग नक्षत्र सुरू झाल्याने शेतकरी वर्ग शेतीच्या कामात लागला आहे. त्यात चिमूरपासून १५ किमी अंतरावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पाजवळील मासळ बु, कोलारा, सातारा, बामनगाव, मदनापूर, देवळी, करबडा या गावातील शेती जंगलाला लागून आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतावर जावे लागते. मात्र अश्यातच जंगली प्राणी हल्ला करतात.यामध्ये शेतकऱ्यांचा नाहक बळी जात आहे. मागील पाच महिन्यात मासळ, कोलारा, सातारा, बामनगाव या गावातील पाच लोकांना वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला. त्यामुळे आता या गावातील नागरिकांत भीती पसरली असून आता शेतीचे कामे कशी करायची, ही चिंता आहे. वनविभागाने याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे.

मृतकाच्या कुटुंबीयांना तत्काळ मदतशेतीचे काम करताना वाघाच्या हल्ल्यात कोलारा येथील राजेश दडमल यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. मृतकाच्या कुटुंबीयांना वनविभागाने तत्काळ पाच लाख रुपयांची मदत दिली. उर्वरित रक्कम मृतकाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर देण्यात येईल, असे आश्वासन वन विभागाने दिले. यावेळी डिएफओ गुरू प्रसाद, एसीएफ जाधव, डिसीएफ लडकत, एसीफ खोरे, पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे, वनपरिक्षेत्र अधिकारी ठेमस्कर उपस्थित होते.

टॅग्स :Tigerवाघ