शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरलगतच्या लेंडारी परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 15:30 IST

येथून जवळच असलेल्या लेंडारी शिवारात काम करीत असणाऱ्या दोन शेतकऱ्यांना अचानक पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. वाघ पाहून दोघेही भांबावले. दरम्यान वाघाने या दोघांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देसतर्कतेमुळे दुर्घटना टळलीदोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या लेंडारी शिवारात काम करीत असणाऱ्या दोन शेतकऱ्यांना अचानक पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. वाघ पाहून दोघेही भांबावले. दरम्यान वाघाने या दोघांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. लाठ्याकाठ्या काढून आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.गोपाल थेरकर व सुरेश शेंडे अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे, चिखलगाव - गिरगाव मार्गावरील नाल्याजवळ दोन दिवसांपूर्वी दोन बछड्यासह वाघिणीने दर्शन दिले होते. नागरिकांची गर्दी उसळल्यानंतर वाघीण एका बछड्याला घेऊन पळून गेली. मात्र एक बछडा नाल्याजवळच होता. वनविभागाचे कर्मचारी व पोलीस त्या बछड्यावर पाळत ठेवून असतानाच तो रात्रीच्या सुमारास नाल्याजवळून गायब झाला. त्यामुळे या वाघिणीचा व बछड्याचा वन कर्मचाऱ्यांनी शोध सुरू केला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी गोपाल थेरकर व त्याचे सहकारी सुरेश शेंडे यांना लेंडारी परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. वाघाने या दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकऱ्यांनी लाठीचा वापर करून कसेबसे वाघाला हुसकावून लावले. त्यांच्या सतर्कतेमुळे दुर्दैवी घटना टळली. दोन दिवसांपूर्वी वाघीण व दोन बछडे, त्यानंतर शुक्रवारी जवळच्याच परिसरात पुन्हा वाघाचे दर्शन झाल्याने वाघीण, वाघ आणि बछडे एकत्रच असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.वारंवार वाघाचे दर्शन होत असल्यामुळे झाडबोरी, नांदगाव, नांदेड, कन्हाळगाव, चिखलगाव या गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले आहे.तो बछडा वाघिणीकडे पोहचल्याचा दावागिरगाव मार्गावरील नाल्याजवळ असलेला बछडा बुधवारी रात्री वनविभाग व पोलीस यांची पाळत असतानाही अचानक गायब झाला होता. त्यानंतर वनविभागाने शोधमोहीम राबविली. दरम्यान हा बछडा वाघिणीकडे सुखरुप पोहचल्याचा दावा वनविभागाने केला आहे. परंतु वनविभागाचा हा दावा फोल असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Tigerवाघ