शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर वीज केंद्र परिसरात वाघाचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 00:19 IST

चंद्रपूर वीज केंद्राच्या परिसरात पट्टेदार वाघ, बिबट, अस्वल या वन्यप्राण्यांचे वास्तव्य आढळून येत आहे. अनेकांना या परिसरात पट्टेदार वाघांचे दर्शन झाले आहे. त्यामुळे वीज केंद्राच्या वसाहतीत व आजुबाजुच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदुर्गापूर (चंद्रपूर) : चंद्रपूर वीज केंद्राच्या परिसरात पट्टेदार वाघ, बिबट, अस्वल या वन्यप्राण्यांचे वास्तव्य आढळून येत आहे. अनेकांना या परिसरात पट्टेदार वाघांचे दर्शन झाले आहे. त्यामुळे वीज केंद्राच्या वसाहतीत व आजुबाजुच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, या हिंस्र प्राण्यामुळे एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता असल्याने वसाहतीतील नागरिकांनी व लगतच्या ग्रामवासीयांनी सतर्क रहावे, अशा सूचना वीज केंद्र व्यवस्थापनाने केल्या आहेत.चंद्रपूर वीज केंद्राच्या परिसरात हिंस्त्र वन्यजीवांचा अधिवास आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य वनसंरक्षक यांच्यासोबत बैठका झाल्याचे वीज केंद्र व्यवस्थापनाने म्हटले आहे. त्यात सूचविलेल्या उपाययोजनानुसार वीज व्यवस्थापनाने परिसरातील झाडे-झुडुपांची छाटनी करून साफसफाई केली. गावागावात दवंडी पिटण्यात आली आहे. टॅÑप कॅमेरे व मनुष्यबळ उपलब्ध करून योग्य ती कार्यवाही केली. तथापि १२ जूनला आंभोरा गाव परिसरात एका इसमावर वाघाने हल्ला केला. तात्काळ सुरक्षा विभागाचे सहकार्य लाभल्याने त्याचे प्राण वाचले. त्यानंतर १४ जुलैला एक इसम व वाघ समोरासामोर आले. सदर घटनेने चंद्रपूर वीज केंद्रात कार्यरत अधिकारी, कर्मचारी व त्यांचा कुटुंबीयामध्ये तसेच गाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरीता वीज केंद्राच्या फ्लॉय अ‍ॅश व वसाहत परिसरामध्ये पाळीव जनावरे सोडू नये. तसेच अनावश्यक कामासाठी वीज केंद्र परिसरात प्रवेश करू नये, असे आवाहन वीज केंद्र व्यवस्थापनाने वीज केंद्रालगत असलेल्या आंभोरा, खैरगाव, पद्मापूर, किटाळी, मीनगाव, आगरझरी, मसाळा, तुकूम इत्यादी गावातील सरपंच तथा ग्रामवासीयांना केले आहे.

टॅग्स :Tigerवाघ