शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर महाऔष्णिक केंद्र परिसरात वाघाचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 05:00 IST

बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर वीजकेंद्रातील कंत्राटी कामगार भाेजराज मेश्राम हे कर्तव्यावरून घरी परत जात असताना वीजसंच क्रमांक १ जवळील रेल्वेरूळाजवळ वाघाने भोजराजवर अचानक हल्ला चढविला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरूवारी रात्री दुर्गापूर येथील १६ वर्षीय युवकावर वाघाने हल्ला चढवून ठार केले. त्यामुळे सीएसटीपीएस परिसरानजीक असलेल्या वसाहतींमध्ये प्रचंड दहशत पसरली. रात्रपाळीत कर्तव्य बजावणारे कामगारही हादरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा जंगल परिसरातील लागूनच असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राच्या परिसरात वाघ-बिबट्याचा धुमाकूळ सुरू झाल्याने नागरिकांना रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडणे कठीण झाले. २४ तासांत वाघाने दोघांचा बळी घेतला. या घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना केली नाही, तर परिस्थिती केव्हाही हाताबाहेर जाऊ शकते, असा अंदाज आल्याने नागरिकांत आता प्रचंड असंतोष खदखदू लागला आहे.बुधवारी वीजकेंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ वाघ आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा प्रकार सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला होता. हा वाघ ताडोबा जंगलातून चंद्रपूर- नागपूर मार्गावरील राष्ट्रवादी नगर परिसरातील वीजकेंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ आला. काहीवेळ त्याच ठिकाणी भटकून तो पुन्हा जंगलाच्या दिशेने गेला. या परिसराला लागून मोठी वसाहत आहे. परिसरात आलेला वाघ घनदाट जंगलात न जाता त्याच परिसरात फिरत असल्याची शंका नागरिक व्यक्त करीत आहेत. बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर वीजकेंद्रातील कंत्राटी कामगार भाेजराज मेश्राम हे कर्तव्यावरून घरी परत जात असताना वीजसंच क्रमांक १ जवळील रेल्वेरूळाजवळ वाघाने भोजराजवर अचानक हल्ला चढविला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरूवारी रात्री दुर्गापूर येथील १६ वर्षीय युवकावर वाघाने हल्ला चढवून ठार केले. त्यामुळे सीएसटीपीएस परिसरानजीक असलेल्या वसाहतींमध्ये प्रचंड दहशत पसरली. रात्रपाळीत कर्तव्य बजावणारे कामगारही हादरले आहेत.

वाघ-बिबटाचा मानवी वस्तीत शिरकाव- ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघ व बिबट्यांची संख्या वाढली असून नैसर्गिक अधिवास क्षेत्र कमी पडू लागले. त्यामुळे इरई नदीच्या काठाने वाघ-बिबट व हिंस्त्र वन्यप्राणी चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राच्या परिसरात शिरकाव करीत आहेत.

तर घराबाहेर निघणे कठीण- चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राच्या परिसरात घनदाट जंगल तयार झाले आहे. या परिसरात दिवसभर वर्दळ असली तरी रात्रीच्या सुमारास तिथे प्रवेश करणे आता कठीण झाले.   जंगलाला लागून असलेल्या ऊर्जानगर, दुर्गापूर, राष्ट्रवादी नगर परिसरात रानडुकरांसारख्या वन्यप्राण्यांचा संचार नित्याचाच होता. मात्र, आता वाघ व बिबट फिरू लागल्याने नागरिक धास्तावले आहेत. वाघ-बिबट्याचा बंदोबस्त केला नाही, तर घराबाहेर निघणे कठीण होईल, अशी भीती      व्यक्त करीत आहेत.

 

टॅग्स :Tigerवाघ