शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

वाघ मृत्यू प्रकरण; मानद वन्यजीव रक्षकांच्या चुप्पीवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 11:15 IST

उपचाराविना विव्हळत ‘येडा अण्णा’चा मृत्यू झाला. या घटनेने वनविभागावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत

ठळक मुद्देमृत वाघाच्या पंचनाम्यावर स्वाक्षरीपुरतेच महत्त्व असल्याची खंत

राजेश भोजेकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उपचाराविना विव्हळत ‘येडा अण्णा’चा मृत्यू झाला. या घटनेने वनविभागावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तरीही जिल्ह्यातील तीनपैकी एकही मानद वन्यजीव रक्षक या घटनेबाबत उघड बोलायला तयार नाही. वन्यजिवांबाबत तत्परता दाखविणारी ही मंडळी इतकी शांत का, असा सवाल उपस्थित होत आहे.सुमारे दहा वर्षांपूर्वी अदानी प्रकल्पामुळे आधीच प्रदूषित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या प्रस्तावित प्रकल्पामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजिवांचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी भूमिका घेऊन पर्यावरणवाद्यांनी तीव्र आंदोलन उभारले होते. मुद्दा चंद्रपूर जिल्ह्याच्या हिताचा होता. यामुळे चंद्रपूरकरांचीही चांगलीच साथ लाभली. इको-प्रोचे बंडू धोत्रे यांनी तर आमरण उपोषण केले होते. या आंदोलनाची दखल केंद्र सरकारला घ्यावी लागली. आणि अदानीला येथून परत जावे लागले होते. उपचाराविना मरण पावलेला वाघही ताडोबातीलच होता. लगतच्या वनपरिक्षेत्रात जखमांनी विव्हळत त्याचा मृत्यू झाला. चार दिवसांपासून त्याच्या बातम्या वृत्तपत्रात झळकत असतानाही जिल्ह्यातील तीनपैकी एकही मानद वन्यजीव रक्षक वाघाच्या मदतीला धावून गेला नाही. मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे हे शवविच्छेदन करताना उपस्थित होते. एका स्थानिक वन्यजीव प्रतिनिधी व्यतिरिक्त विवेक करंबेकर व अमोल बैस हे दोन्ही मानद वन्यजीव रक्षक कुठेही दिसले नाही.या घटनेनतंरही ही मंडळी आपली भूमिका पुढे येऊन स्पष्ट करताना दिसली नाही. यामुळे वन्यजीवांचा वाली कोण, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. एका व्हॉट्सअ‍ॅप गु्रपवर तर एका वन्यजीवप्रेमीने ‘झाले ते झाले यानंतर तत्परता दाखवावी म्हणजे झाले’, अशी पोस्ट टाकली आहे. या पोस्टमधून वाघावर वेळीच उपचार का झाले नाही हे ठासून विचारण्याऐवजी अधिकारी दुखावू नये याचीच काळजी घेतल्याचे दिसून येते.

आम्ही मानद वन्यजीव रक्षक नावालाच ठरलो आहे. वनविभागाचे अधिकारी केवळ वाघ मरण पावला तर पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्याकरिता बोलावतात. कधी कुठल्या बैठकांनाही बोलावत नाही. वाघ जखमी होता. मात्र उपचाराबाबत काय भूमिका घेतली पाहिजे हे विचारणे तर सोडाच या घटनेचीही माहिती दिलेली नाही. अधिकारी वनमंत्र्यांचीही दिशाभूल करीत आहेत. आम्हीच अशा घटना वनमंत्र्यांपर्यंत पोहचवितो. फक्त विश्वासातल्या लोकांनाच हे अधिकारी सांगत असतात.- अमोल बैस, मानद वन्यजीव रक्षक, चंद्रपूर.

वनविभागाने ही घटना कळविलीच नाही. स्वयंसेवी संस्थांमार्फत ही माहिती मिळाली. वनविभाग असा का करतो हे मात्र सांगू शकत नाही. वाघावर उपचार करण्यात दिरंगाई झाली हे जगजाहीर आहे. वनमंत्र्यांनी अहवाल मागितला आहे. त्या अहवालात अधिकारी काय लिहून देतात हे कळेलच. त्यानंतरच आपली भूमिका घेणार आहे. हे प्रकरण ‘लोकमत’मुळेच उजागर झाले.- विवेक करंबेकर, मानद वन्यजीव रक्षक, ब्रह्मपुरी.

गंभीर स्वरपाच्या जखमी वाघावर उपचार करण्यासाठी एसओपीच्या नियमावलीत शिथिलता असावी. तसे झाल्यास अशा घटना टाळता येतील, असे पत्र एनटीसीएला पाठविले आहे.- बंडू धोत्रे, मानद वन्यजीव रक्षक, चंद्रपूर.

टॅग्स :Tigerवाघ