शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वयोवृद्ध गुराख्यावर वाघाचा हल्ला; जखमी अवस्थेत कुऱ्हाडीने पिटाळून लावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 11:16 IST

Chandrapur News Tiger ताडोबातील बफर झोन क्षेत्रातील शिवनी वनपरिक्षेत्रात गुरे चारत असताना अचानक वाघाने गुराख्यावर हल्ला केला. यात गुराखी जखमी झाला. मात्र अशाही अवस्थेत त्यांनी धाडस दाखवत आपल्याजवळील कुऱ्हाड काढून वाघावर प्रतिहल्ला चढविला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर  : ताडोबातील बफर झोन क्षेत्रातील शिवनी वनपरिक्षेत्रात गुरे चारत असताना अचानक वाघाने गुराख्यावर हल्ला केला. यात गुराखी जखमी झाला. मात्र अशाही अवस्थेत त्यांनी धाडस दाखवत आपल्याजवळील कुऱ्हाड काढून वाघावर प्रतिहल्ला चढविला. यामुळे घाबरून वाघ जंगलात पसार झाला. ही घटना कक्ष क्रमांक ५७० मध्ये रविवारी घडली.तेजराम किसन नागपुरे रा. वासेरा असे जखमी गुराख्याचे नाव आहे. शिवनी वनपरिक्षेत्रातील वासेरा क्षेत्रातील कक्ष क्रमांक ५७० मध्ये तेजराम नागपुरे हा स्वत:चे गुरेढोरे चराईकरिता गेला असता तिथेच दबा धरून बसलेल्या वाघाने तेजरामवर हल्ला केला. त्यांच्या पाठीवर पंजा मारला. यात तेजराम जखमी झाले. तरीही त्यांनी समयसूचकता दाखवत आपल्या जवळ असलेल्या कुऱ्हाडीने वाघावर प्रतिहल्ला चढविला. यामुळे घाबरून वाघ जंगलात पसार झाला. लगेच ही माहिती गावातील युवकांना देण्यात आली. युवकांनी वनविभागाला माहिती दिली.वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भाऊराव तुपे, वनपाल चिकाटे, वनरक्षक सुरेश मेश्राम, एस.एस. टापरे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व जखमी तेजराम यांना सिंदेवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर त्यांना चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

टॅग्स :Tigerवाघ