शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जलस्वराज्य-२ च्या माध्यमातून गावे सुजलाम् सुफलाम् करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:21 IST

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जलस्वराज्य-२ कार्यक्रमांतर्गत सात निमशहरी व ३३ पाणी गुणवत्ता बाधित गावांचा समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजितेंद्र पापळकर : सरपंच, सचिव व कंत्राटदारांची जिल्हा परिषदेत सभा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जलस्वराज्य-२ कार्यक्रमांतर्गत सात निमशहरी व ३३ पाणी गुणवत्ता बाधित गावांचा समावेश करण्यात आला आहे. योजना सुरू होण्याआधी ग्रामस्थांना पाणी वापराबाबत चांगल्या सवयी लावणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी पाणी वापराबाबत सजग राहून आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर करावा व पाण्याचा अपव्यय होणार नाही, यासाठी सरपंच व सचिव यांनी आपापल्या गावात पाण्याची चळवळ निर्माण करून गावे सुजलाम् सुफलाम् करावी, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.जिल्हा परिषदेच्या कन्नमवार सभागृहात सरपंच, सचिव व कंत्राटदार यांची जलस्वराज्य-२ गावात सुरू असलेल्या कामासंबंधीच्या प्रगतीबाबतचा आढावा व समन्वय सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून जलस्वराज्य-२ कार्यक्रमाचे प्रकल्प व्यवस्थापक दिलीप देशमुख, आयुक्त कार्यालयाचे उपअभियंता शरद रोडे उपस्थित होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मोहिते, कार्यकारी अभियंता संजय वाघ, कार्यकारी अभियंता दशरथ पिपरे वरिष्ठ भुवैज्ञानिक विश्वास वालदे, समाज व्यवस्थापन तज्ज्ञ मंगेश भालेराव, विभागीय समन्वयक विशाल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.सभेला मार्गदर्शन करताना जलस्वराज्य-२ चे प्रकल्प व्यवस्थापक म्हणाले, या प्रकल्पात चंद्रपूर जिल्ह्यातील ४० गावे समाविष्ट करण्यात आले आहे. मीटर पद्धतीसुद्धा ही उच्च दर्जाची राहणार असून प्रत्येकाला पाणी पोहचले पाहिजे, ही शासनाची भूमिका असून त्याची अंमलबजावणी करणे सरपंच, सचिव तसेच ग्रामस्थ यांची असल्याचे ते म्हणाले.जलस्वराज्य -२ योजनेच्या एकार्जूना व कुचना या गावातील कामांच्या प्रगतीची पाहणी करण्यात आली. यावेळी दोन्ही गावातील सरपंच व ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. जलस्वराज्य-२ कार्यक्रमाबाबतची सद्यस्थिती व प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मोहिते यांनी केले. राज्यस्तरावरुन मंगेश भालेराव यांनी सादरीकरण केले.