शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

अत्याचार प्रकरणात पुन्हा तिघे गजाआड

By admin | Updated: November 13, 2014 22:59 IST

येथील तुकूम परिसरातील एका युवकाला बेदम मारहाण करीत त्याच्या प्रेयसीवर अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेल्या तीन आरोपींना बुधवारी रामनगर पोलिसांनी नागपुरातून अटक केली.

नागपुरात लावला सापळा : १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीचंद्रपूर: येथील तुकूम परिसरातील एका युवकाला बेदम मारहाण करीत त्याच्या प्रेयसीवर अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेल्या तीन आरोपींना बुधवारी रामनगर पोलिसांनी नागपुरातून अटक केली. या आरोपींना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.शेख कदीर शेख जाकीर (३०) रा.तुकूम तलाव, वसीमखान अजिमखान (३१) रा.सरकारनगर, सिराजखान शहजान खान (३०) रा.हनुमाननगर अशी बुधवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी मकसूद शेख याला घटनेच्या दुसऱ्या दिवशी तर या प्रकरणातील एक अन्य अल्पवयीन आरोपीला दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. आरोपी शेख कदीर शेख जाकीर, वसीमखान अजिमखान, सिराजखान शहजान खान यांना गुरूवारी येथील जिल्हा न्यायालयात उभे केले असता, न्यायालयाने त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. घटनेनंतर हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होेते. मोबाईलवरून मिळणाऱ्या लोकेशनच्या माध्यमातून पोलिसांचे विशेष पथक त्यांच्या मागावर होते. मात्र प्रत्येकवेळी हे आरोपी पळून जाण्यात यशस्वी होत असत. मात्र बुधवारी नागपूर येथे तीनही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू भुजबळ, रामनगरचे ठाणेदार प्रल्हाद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुभाष बारसे, एएसआय सुरेंद्र तिवारी, पोलीस हवालदार सुनील बोरीकर, गजानन तुपकर, श्याम बारसागडे, दिवाकर रामटेके, विलास बलकी, नायक पोलीस शिपाई गजानन डोईफोडे, राकेश बंजारीवाले, पंकज शिंदे, किरण वाडीकर, प्रकाश निखाडे, नितीन दुधे, बंटी बेसरकर, रामकृष्ण सानप, प्रमोद कोटनाके यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)