सावर्ला जंगलात धाड : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाईतळोधी (बा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू व्यवसाय फोफावला. हे लक्षात घेऊन पोलिसांनी तीन अवैध दारू विक्रेत्यांना शुक्रवारी अटक केली आहे.निवडणूक संपताच तळोधी (बा.) येथील दारू विक्रेत्यांनी सावर्ला परिसरातील जंगलात मोहफुलांची दारू काढत असल्याची गुप्त माहिती तळोधी (बा.) येथील ठाणेदार विवेक सोनवने यांना मिळाली. ठाणेदार सोनवने यांनी सहकाऱ्यांसोबत सावर्ला जंगलात मोहफुलाच्या दारू सडव्या सहीत तीन आरोपीना पकडले. त्यात आरोपी माणिक निंबू सडमाके (५०) रा. सावर्ला तह. नागभीड, रवी दिनकर राऊत (३०) रा. तळोधी, दिनकर भीषण राऊत (६०) रा. तळोधी (बा.) यांना दारू काढताना अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्या जवळील आठ मोठे ड्रम, आठ मोठे लहान छोटे ड्रम, दोन मोठे कटोरे, अॅल्युमिनीअम, दोन चाहू, तीन लोखंडी ड्रम, दोन प्लास्टिक पाईप, एक माचीस व दोन सायकली अशा प्रकराचा ३६ हजार ६५० रुपयाचा माल सडव्यासह जप्त करण्यात आला. त्यांना मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करून अटक करण्यात आली. वरील कारवाई ठाणेदार विवेक सोनवने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष सोनटक्के, पोलीस हवालदार चनेकर, पोलीस शिपाई संजय मांढरे, पोलीस शिपाई राहुल धुडसे, सयाम आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)
तीन दारू विक्रेत्यांना अटक
By admin | Updated: February 18, 2017 00:36 IST