शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

तीन महिन्यात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: November 21, 2015 00:43 IST

कर्जबाजारीपणा व नापिकीचा फटका : तीन पात्र तर दोन आत्महत्या शासकीय मदतीस अपात्र

कर्जबाजारीपणा व नापिकीचा फटका : तीन पात्र तर दोन आत्महत्या शासकीय मदतीस अपात्रप्रवीण खिरटकर वरोरा चंद्रपूर जिल्ह्यात आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तीन महिन्यात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात शेतकरी आत्महत्या तपासणी बाबत जिल्हास्तरीय समितीने तीन आत्महत्या पात्र तर दोन अपात्र ठरविल्या आहेत.नापिकी, कर्जबाजारीपणा, कर्ज परतफेडीचा तगदा या तीन कारणांनी आत्महत्या केल्या असल्यास शासनाकडून सन २००६ पासून आर्थिक मदत दिली जाते. याची अंतिम तपासणी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय बैठकीत करून त्याबाबत निर्णय देण्यात येत असते. या समितीने तीन महिन्यात घडलेल्या पाच आत्महत्या प्रकरणांपैकी दोन प्रकरणे अपात्र ठरविली आहेत.पोंभुर्णा तालुक्यातील सोनापूर गावातील नानाजी उर्फ रामकृष्ण शंकर पिंपळशेंडे या शेतकऱ्याने ५ सप्टेंबर २०१५ रोजी गावाच्या पायवाटे लगतच्या विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. मृतावर दोन लाख ३१ हजार ६१९ रुपयाचे आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी आष्टाचे कर्ज होते. त्याच्या नावाने पाच हेक्टर जमीन होती. ही आत्महत्या जिल्हास्तरीय समितीने आर्थिक मदतीसाठी पात्र ठरविली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा येथील गणपत वसंत कुत्तरमारे या शेतकऱ्याने २६ आॅगस्ट रोजी गळफास लावून आत्महत्या केली. मृताच्या वडीलाने नावे, पत्नीच्या नावे कर्ज होते. हे प्रकरणही पात्र ठरविण्यात आले. पोंभूर्णा तालुक्यातील थेरगाव येथील अरविंद जैराम वेलादी याने २६ आॅगस्ट रोजी विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. मात्र हे प्रकरण आर्थिक मदतीसाठी अपात्र ठरविले आहे. भद्रावती तालुक्याील घोडपेठ येथील अमरदीप दिलीप गहुकार याने २७ सप्टेंबर रोजी शेततळ्यात आत्महत्या केली. सदर प्रकरणात ट्रॅक्टरची कामे करीत असल्याने अपात्र ठरविण्यात आले. वरोरा तालुक्यातील दिंदोडा येथील देवेंद्र कवडू आत्राम या शेतकऱ्याने ११ सप्टेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्यावर सहकारी सोसायटीचे कर्ज होते. सदर प्रकरण जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविले आहे.