शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या धडकेत तीन चितळ ठार

By राजेश भोस्तेकर | Updated: May 20, 2024 12:02 IST

गोंदिया - बल्लारशाह रेल्वे रुळावरील घटना

चंद्रपूर :;ब्रह्मपुरी वन विभागमधील तळोधी वनपरिक्षेत्रातील तळोधी नियतक्षेत्र गंगासागर हेटी बिट कक्ष क्रमांक ९० मध्ये गोंदिया - बल्लारशाह रेल्वे रुळालगत रेल्वेच्या धडकेमध्ये तीन चितळ्यांचे मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री १० वाजता उघडकीस आली. 

नागभीडकडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या रेल्वे इंजिनच्या धडकेने घटना घडल्याची  माहिती मिळताच रेल्वे पोलीस व तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील कर्मचारी स्वाब संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहोचले. मोक्का पंचनामा करून रात्री दोन वाजता तिन्ही मृत चितळांना वनविभागाच्या  सावरगाव येथील रोपवाटिकेमध्ये आणले. सोमवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. यापैकी एक दीड ते दोन वर्षे वयाचा तर दोन चितळ अंदाजे तीन ते साडेतीन वर्षे वयाचे असून त्यापैकी एक चितळ हे गर्भावस्थेत असल्याचे आढळून आले. यावेळी तळोधी बा.चे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कंन्नमवार, तळोधीचे क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, वनरक्षक राजेंद्र भरणे, वनरक्षक पंडित मेकेवाळ, स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, जिवेश सयाम सदस्य सर्पमित्र, व इतर सदस्य उपस्थित होते.      या रेल्वे रुळामुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात

विशेष म्हणजे गोंदिया - बल्लारशाह रेल्वे लाईन ही ताडोबा आणि ब्रह्मपुरी वन विभागाच्या जंगलामधूनच गेलेली असल्यामुळे या मार्गावर सतत  वन्यजीव मृत पावल्याच्या घटना घडतात. यामध्ये चिचपल्ली- मुल- नागभीड- तळोधी - सिंदेवाही या परिसरामध्ये वाघ, अस्वल, बिबट आणि सांबर, चितळ, नीलगाय, रानगवा, अशा पद्धतीचे वन्यजीव सतत मरत असतात. त्यामुळे जंगलातून चालणाऱ्या रेल्वेची वेग मर्यादा ही कमी असावी. तसेच दोन्ही रेल्वे ट्रॅकच्या बाजूला जाळीचे कुंपण केलेले असावे जेणेकरून या प्रकारच्या दुर्दैवी घटना घडणार नाही, सोबतच रेल्वे विभागावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यायला हवा. जेणेकरून अशा दुर्दैवी घटना कमी करता येतील.- यश कायरकर, अध्यक्ष, 'स्वाब नेचर केअर फाउंडेशन.'

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर