शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात बनावट एटीएम कार्डने पैसे काढणाऱ्या तिघांना अटक; मुख्य सूत्रधार दिल्लीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 09:41 IST

बनावट एटीएम कार्डने दिल्ली व गुडगाव येथून लाखो रुपये लंपास करणाऱ्या तिघांना चंद्रपूर सायबर गुन्हे विभागातील पोलिसांनी चंदीगड येथून अटक केली.

ठळक मुद्दे१३ लाखांहून अधिक रक्कम काढली सर्व आरोपींना दिले होते प्रशिक्षण

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चोरट्यांनी जिल्ह्यातील नऊ व्यक्तींच्या एटीएममधून १३ लाख ७९ हजार रुपये लंपास केले होते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकेर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यातील मुख्य सूत्रधार दिल्ली येथील रहिवासी असल्याचेही त्यांनी सांगितले.मागील दोन महिन्यांपासून दिल्ली व गुडगाव येथील काही व्यक्तींनी एटीएममधून पैसे काढल्याच्या तक्रारी वरोरा, रामनगर, व राजुरा पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आल्या होत्या. याप्रकरणाची सायबर विभागाने कसून चौकशी केली. दरम्यान, १६ अंकी क्रमांक चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी वरोरा येथून अटक केली. अधिक चौकशी केली असता, मुख्य आरोपी दिल्ली येथील रहिवासी असल्याचे समजले. त्यामुळे चंद्रपुरातील सायबर गुन्हे विभागाचे विशेष पथक लगेच दिल्ली येथे रवाना झाले. मात्र आरोपीला कुणकुण लागताच तो दिल्ली येथून चंदीगडला फरार झाला. दरम्यान चंदीगड येथील एका हॉटेलमधून मुख्य आरोपीला अटक केली. या गुन्ह्यात अन्य एक साथीदार सहभागी असल्याचे सांगितल्याने त्यालाही दिल्ली रेल्वे स्थानकावरुन जेरबंद केले. मुख्य आरोपी हा ओडिसा राज्यातील मलकानगिरी, तर दुसरा आरोपी बिहारमधील नोनी गया येथील आहे. तिन्ही आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली. यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विकास मुंढे उपस्थित होते.

आरोपीवर विविध गुन्हेया प्रकरणातील मुख्य आरोपीने आपल्या अन्य साथीदारांंना प्रशिक्षण देऊन ठिकठिकाणी पाठविले होते. हे आरोपी अत्यंत हुशारीने एटीएम कार्ड आणि पीन क्रमांकाची चोरी करायचे. या सर्व प्रकाराची इत्थंभूत माहिती दिल्लीतील मुख्य आरोपीला दिली जात होती. त्यानंतर बनावट एटीएम कार्ड तयार करुन त्याद्वारे रक्कम लंपास करणे सुरू होते. मुख्य आरोपीविरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याची माहितीही पोलीस तपासातून पुढे आली आहे.विदर्भातून २०० एटीएमधारकांचा चोरला डेटाअमरावती : एटीएम क्लोनिंग प्रकरणातील आरोपींनी विदर्भातील तब्बल २०० खातेदारांचा एटीएम डेटा चोरल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणात अमरावती पोलिसांनी एकास, तर चंद्रपूर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. चंद्रपुरातील तीन आरोपींना अमरावती पोलीस प्रॉडक्शन वॉरन्टवर ताब्यात घेणार आहे. बँक खात्यातून परस्पर पैसे चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील चार आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. यातील हरीश बिस्वास, विशाल उमरे व आलोक नावाच्या आरोपीस चंद्रपूर पोलिसांनी, तर परितोष पोतदारला अमरावती पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली. या चौघांची पोलीस कोठडीत चौकशी सुुरू आहे. परितोष पोतदार व विशाल उमरे हे दोघेही खातेदारांचा डेटा चोरण्यासाठी अमरावतीत आले होते. या दोघांनी अमरावतीतील ५० ते ६० जणांचे एटीएम क्रमांक व पासवर्ड दिल्लीत बसलेला बॉस बिस्वासकडे पाठविले होते, तर विदर्भातील विविध शहरातील खातेदारांचा डेटा पाठविल्याची माहिती आरोपींनी दिली आहे.

टॅग्स :atmएटीएमRobberyदरोडा