शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

दुकानफोडीतील तीन आरोपी जेरबंद

By admin | Updated: August 3, 2014 00:01 IST

येथील मुख्य मार्गावरील महात्मा गांधी व्यापार संकुलातील मोबाईल दुकान फोडून त्यातील चार लाख ३२ हजार १५२ रुपयांचा माल चोरी करून नेलेल्या आरोपींना मुद्देमालासह बल्लारपूर पोलिसांंनी पकडले आहे.

बल्लारपूर :येथील मुख्य मार्गावरील महात्मा गांधी व्यापार संकुलातील मोबाईल दुकान फोडून त्यातील चार लाख ३२ हजार १५२ रुपयांचा माल चोरी करून नेलेल्या आरोपींना मुद्देमालासह बल्लारपूर पोलिसांंनी पकडले आहे. दुकान फोडणाऱ्या आरोपींंचे नाव दीपक चंदू पोलकर (२५) आणि संतोष शामलाल बहुरिया (२४) दोघेही रा. लालबोडी भाग गोरक्षण वार्ड बल्लारपूर असे असून या दोघांना तद्वतच दीपक याची पत्नी आरती दीपक पोलकर (२१) हिला चोरीचा माल वापरल्या प्रकरणी आरोपी म्हणून गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या आरोपींनी २० जुलैच्या रात्री गांधी व्यापार संकुलातील राजेश तिलोकानी यांच्या मालकीच्या श्रीकृष्ण मोबाईल शॉपी या दुकानाची मागण्या भागातची भिंत फोडून दुकानातील २५ मोबाईल, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, चार्जर इत्यादी वस्तू चोरुन नेल्या व त्या आपल्या घरी लपवून ठेवल्या होत्या. चोरी केल्यानंतर त्यांनी दुकानाच्या भिंंतीवर ‘एक्स गॅग’ असे लिहून ठेवले होते. त्यामुळे या चोरीत पाच सहा जणांचा तरी सहभाग असावाा असावा अंदाज होता. या चोरीचा तपास पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरुमणी टांडी यांनी चालविला आणि दहा दिवसात या चोरीचा छडा लावून आरोपींना संपूर्ण मुद्देमालासह अटक केली. या दोघांनी यापूर्वी एका दुकानातून टीव्ही व इलेक्ट्रीक सामान चोरुन आपल्या घरी दडवून ठेवले होते. या झडतीत त्याही वस्तू पोलिसांनी जप्त केल्या. दीपक व संतोष हे दोघेही रेल्वे सफाई कामगाार आहेत. (तालुका प्रतिनिधी)