शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

विविध मुद्यांवरून गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:38 IST

डम्पींग यार्डमधील कचरा प्रक्रियेसाठी अंबुजा कंपनीला देणे, पदाधिकाऱ्यांच्याच प्रभागात नगरोत्थानचा निधी देणे आणि मूल मार्गाला जोडणाऱ्या बायपास रोडला मंजुरी देणे, या तीन विषयांवरून मनपाच्या बुधवारी झालेल्या आमसभेत चांगलाच गदारोळ झाला.

ठळक मुद्देमनपाची आमसभा : अंबुजा कंपनीला कचरा देऊ नये

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : डम्पींग यार्डमधील कचरा प्रक्रियेसाठी अंबुजा कंपनीला देणे, पदाधिकाऱ्यांच्याच प्रभागात नगरोत्थानचा निधी देणे आणि मूल मार्गाला जोडणाऱ्या बायपास रोडला मंजुरी देणे, या तीन विषयांवरून मनपाच्या बुधवारी झालेल्या आमसभेत चांगलाच गदारोळ झाला. नगरसेवकांनी सभागृहासमोर प्रश्नांची सरबत्ती करून सभागृह दणाणून सोडले.महानगरपालिकेची आमसभा बुधवारी मनपाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. महापौर आणि आयुक्त विदेशवारीवर असल्यामुळे ही आमसभा उपमहापौर अनिल फुलझेले यांच्या अध्यक्षतेखाली झाली.या आमसभेत अंबुजा सिमेंट कंपनीला कम्पोस्ट डेपोतील कचरा देण्याचा विषय अजेंड्यावर होता. शहर विकास आघाडीचे गटनेते व नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या संदर्भात एक पत्र महापौरच्या नावे लिहिले होते.अंबुजामध्ये प्लॉस्टिक व कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने कंपनीविरोधात कारवाई करण्यात यावी, असा ठराव उपरवाही ग्रामसभेत घेण्यात आला होता.या ठरावाची प्रत देशमुख यांनी महापौर यांना दिलेल्या तक्रारीसोबत जोडलेली होती. या तक्रारीच्या प्रत देशमुख यांनी सर्व नगरसेवकांना देऊन सहकार्य करण्याची विनंतीसुध्दा केली होती. त्यानुसार आजच्या आमसभेत या विषयाला तीव्र विरोध करण्यात आला.सध्या मनपाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्या बाबतीत बेजबाबदारपणे काम करणाºया व गोरगरीब ग्रामीण लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाºया कंपनीला प्रक्रिया करण्यासाठी कचरा देणे योग्य नाही, अशी भूमिका पप्पु देशमुख यांनी मांडली. त्याला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे अंबुजाला कचरा देण्याचा ठराव रद्द करण्यात आला.निधी वाटपाचा मुद्दा पुन्हा गाजलानगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मनपाला निधी मिळाला. मात्र मनपा पदाधिकाºयांनी हा निधी आपल्याच प्रभागात देऊन इतर प्रभागाला ठेंगा दाखविला. यावरून मागील अनेक दिवसांपासून मनपाच्या नगरसेवकांमध्ये वादविवाद सुरू आहे. इतर पक्षाच्या नगरसेवकांसोबत सत्ताधारी भाजपाचे नगरसेवकही यामुळे नाराज आहे. आमसभेत यावरून उफाळलेला असंतोष सभागृहासमोर आला. काँग्रेस, बसपा, भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांनी डायससमोर येऊन याबाबत सभागृहाला जाब विचारला. याबाबत समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने चांगलाच गदारोळ झाला.दत्तनगरला नगरोत्थानमधून डावलल्याचा निषेधवडगाव प्रभागातील दत्त नगरमध्ये ९०० च्या वर लोकसंख्या आहे. याठिकाणी मागील २० वर्षांपासून रस्ते, नाल्या अशी विकासकामे झालेली नाहीत. २०१७-१८ या वर्षासाठी आलेल्या नगरोत्थान निधीमधूनही दत्त नगरला वगळण्यात आले. याचा नगरसेवक देशमुख यांनी याबाबत सभागृहात निषेध केला.रिंग रोडवरूनही वादतुकूम परिसरातून मूल मार्गाला जोडणाऱ्या रिंग रोडला मंजुरी देण्याचा विषय चर्चेसाठी आला. या रोडमुळे सहाशे ते सातशे घरांना हटवावे लागणार म्हणून नगरसेवक सुभाष कोसनगोट्टूवार यांनी याला विरोध दर्शविला. हा रोड महेशनगर रेल्वे लाईन ते विधी महाविद्यालयपर्यंतचा भाग वगळून करण्यात यावा, अशी मागणी केली. मात्र भविष्यात या रिंगरोडची गरज आहेच. त्यामुळे यावर उपाययोजना करीत रोडला मंजुरी द्यावी, असे काही नगरसेवकांचे म्हणणे होते. प्रसंगी उड्डाणपूल बांधावा, असेही काहींनी सूचविले. अखेर एकही घर बाधित न होता सदर रिंग रोड बनविण्यास मंजुरी द्यावी, असा ठराव पारित करण्यात आला.