आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी १९८२ व १९८४ ची पेन्शन योजना बंद करून डीसीजीएस/एनजीएस योजना सुरू केली. मात्र केंद्र आणि अन्य राज्यात जुनीच पेन्शन योजना सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी हजारो शासकीय कर्मचारी नागपूर येथे येत्या १८ डिसेंबरला आक्रोश करीत मुंडण करणार आहेत.१९८२ व १९८४ च्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना भविष्यात निवृत्ती व मृत्यूनंतर शेवटच्या पगारावर आधारित निश्चित व महागाईनुसार वाढणारी पेन्शन मिळत होती. ती राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना बंद केली. त्याऐवजी डीसीजीएस/एनजीएस ही अन्यायकारक योजना सुरू केल्याची बाब संबंधित कर्मचाऱ्यांना टोचत आहे.
जुन्या पेन्शनसाठी हजारो शासकीय कर्मचाऱ्यांनी केली मुंडणची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 09:52 IST
महाराष्ट्र सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी हजारो शासकीय कर्मचारी नागपूर येथे येत्या १८ डिसेंबरला आक्रोश करीत मुंडण करणार आहेत.
जुन्या पेन्शनसाठी हजारो शासकीय कर्मचाऱ्यांनी केली मुंडणची तयारी
ठळक मुद्दे१८ डिसेंबरला नागपुरात करणार निषेध