धाबा : कोंडय्या महाराज जन्म जयंतीप्रीत्यर्थ दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कोंडय्या महाराज संस्थान द्वारा आयोजित भव्यदिव्य अग्निकुंडातून हजारो भाविक चालले.धाबा येथे संत कोंडय्या महाराज जन्मजयंतीप्रीत्यर्थ संस्थानद्वारे भव्यदिव्य अग्निकुंडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाराजाच्या हयातीत अग्निकुंडाचा कार्यक्रम असायचा. त्यानिमित्त ११ फेब्रुवारीच्या पहाट पुरोहित शंकरअय्या आंबेदेवा, तुमरी रामेश्वर शेगमवार व त्यांचे सहकारी यांच्याकडून मध्यरात्रीपासून कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहाटे धगधगत्या निखाऱ्यावरून हजारो भाविक अग्निकुंडातून चालले. शनिवारी गोपालकाला झाला.
हजारो भाविक अग्निकुंडातून चालले
By admin | Updated: February 13, 2016 00:35 IST