शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
3
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
4
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
5
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
6
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
7
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
8
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
9
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
10
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
11
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
12
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
13
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
14
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
15
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
16
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
17
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
18
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
19
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
20
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...

हजारो भाविकांनी घेतले माता महाकालीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:01 IST

रविवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या प्रसिद्ध महाकाली मातेच्या चरणी पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी माथा टेकत देवीचे दर्शन घेतले. यासाठी पहाटेपासून भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. नवरात्रोत्सवासाठी मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी केली असून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : रविवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या प्रसिद्ध महाकाली मातेच्या चरणी पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी माथा टेकत देवीचे दर्शन घेतले. यासाठी पहाटेपासून भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. नवरात्रोत्सवासाठी मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी केली असून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी ७ वाजता मंदिर प्रशासनाच्या वतीने सुनिल महाकाले, प्रकाश महाकाले, मोहन महाकाले तसेच पुजारी गजानन चन्ने आदींच्या हस्ते पुजाअर्चना करण्यात आली. त्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.नवरात्रोत्सवातील गर्दी बघता कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी महाकाली मंदिर संस्थेने ठिकठिताणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून ३० सुरक्षारक्षक तसेच १०० च्या वर स्वयंसेवक कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, भक्तांना त्रास होऊ नये यासाठी मंदिर परिसरात मोठा मंडप तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे.प्रसाद वितरणासाठी भाविकांची गर्दीनवरात्रोत्सवामध्ये मोठ्या संख्येने भाविक देवीला नैवद्य अर्पण करतात. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने प्रशासनाने भाविकांना पेढा वितरणासाठी बुकिंगची व्यवस्था केली आहे. ज्या दिवशी भाविकांचा नंबर असेल त्याच दिवशी ते पेढा वितरीत करू शकणार आहे.देवीच्या दुप्पट्याला विशेष मागणीयात्रेसाठी येणारी गर्दी बघून याठिकाणी अनेक दुकाने थाटली आली. यामध्ये देवीच्या नावाचे दुप्पटे आहेत. युवावर्गाकडून या दुप्पट्याला विशेष मागणी असल्याची माहिती दुकानदारांनी दिली. सोबतच कुुकंू, हळदी, ओटीच्या साहित्याचेही विशेष मागणी आहे.विविध दुकाने सुजलीमहाकाली देवी दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे याठिकाणी विविध प्रकारचे दुकाने सजली असून भाविकही मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसून येत आहे. पुजा करताना देवीला कुंकू, गुलाल वाहण्यात येते. नारळ फोडण्यात येतो. त्यामुळे कुंकू, गुलाल, बुक्का, नारळ, मिठाईची दुकाने मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.दर्शनासाठी भाविकांच्या रांगादेवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. ही गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात बॅरिकेट्स लावण्यात आले असून विविध ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. महाकाली मंदिरात दोन मूर्ति आहेत. एक उभी मूर्ति म्हणजे लाल, पिवळा आणि नारंगी रंगाचे कापड असलेली मुख्य मूर्ती. मुख्य मूर्ती शिवलिंगशीदेखील आहे. दुसरी मूर्ती मूळ जागेच्या खाली आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी, एक विशिष्ट प्रकारचे सुरंगामधून चालणे आवश्यक आहे .

टॅग्स :Navratriनवरात्री