शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राज्यभरातून भाविकांचे जत्थे चंद्रपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:43 IST

चंद्रपूरचे आराध्य माता महाकालीची यात्रा २३ मार्चपासून सुरू झाली आहे. या यात्रेत आता भाविकांची गर्दी वाढत असून राज्याच्या विविध भागातून भाविकांचे जत्थे चंद्रपुरात दाखल होत आहे.

ठळक मुद्देभक्तीचे वातावरण : महाकाली यात्रेत गर्दी वाढली

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूरचे आराध्य माता महाकालीची यात्रा २३ मार्चपासून सुरू झाली आहे. या यात्रेत आता भाविकांची गर्दी वाढत असून राज्याच्या विविध भागातून भाविकांचे जत्थे चंद्रपुरात दाखल होत आहे. महापालिका, जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाकडून भाविकांना सुविधा पुरविल्या जात असल्या तरी भाविकांची गर्दी वाढल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे रखरखत्या उन्हातही भाविकांचा उत्साह कायम असल्याने सर्वत्र भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरवर्षी चैत्र पोर्णिमेला चंद्रपूरचे आराध्य दैवत ऐतिहासिक महाकाली मंदिर परिसरात यात्रा भरते. राज्याच्या विविध भागातून भाविक यानिमित्त माता महाकालीचे दर्शन घ्यायला येतात. २३ मार्चपासून यात्रा सुरू झाली. मात्र सुरुवातीच्या चार दिवस भाविकांची फारशी गर्दी नव्हती. मात्र मागील दोन दिवसांपासून मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढत आहे. ट्रक, मेटॅडोर, ट्रॅक्टर यासारख्या वाहनांनी भाविक चंद्रपुरात येत आहेत.महापालिकेतर्फे आरोग्य सुविधायात्रेत येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोई-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून मंदिर परिसरात एक छोटेखानी दवाखाना उघडण्यात आला आहे. ज्या भाविकाची प्रकृती बिघडली, असे भाविक येथे येऊन उपचार करून घेत आहे. या ठिकाणी नि:शुल्क औषधी देण्यात येत आहे. मात्र एखाद्या भाविकाची प्रकृती अधिकच गंभीर असल्यास त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले जात आहे.निवासाची व्यवस्थाभक्तांच्या निवासाच्या दृष्टीने मंदिराच्या आतील परिसरात दोन मोठे लोखंडी शेड तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी एक धर्मशाळेच्या समोरील विभागात तर दुसरा मंदिराच्या समोर उभारण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी भाविकांनी आपला तात्पुरता संसार थाटला आहे. अनेक भाविक येथे मुक्कामी राहत असल्याने स्वयंपाकही त्याच ठिकाणी करतात. बुधवारी प्रस्तुत प्रतिनिधीने या ठिकाणी फेरफटका मारला असता अनेक भाविक स्वयंपाक करताना दिसून आले.पोलीस विभागातर्फे दोन चौक्यायात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व भाविकांना कुठलीही अडचण जाऊ नये, यासाठी मंदिर परिसरात पोलीस विभागाच्या वतीने दोन तात्पुरत्या चौकी उभारण्यात आल्या आहेत. सर्वत्र तगडा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. भाविकांच्या कुटुंबातील कुणी हरविल्यास पोलीस चौकीतून ध्वनीक्षेपकामार्फत याची माहिती देण्यात येते. जो हरविला असेल, त्याला चौकीत बोलाविण्यात येत व त्याला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जाते.तप्त उन्हात कारंज्याचा गारवाहजारोंच्या संख्येत भाविक दर्शनासाठी येत असल्याने मंदिर परिसरात एकच गर्दी उसळते. त्यामुळे दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. सहा हजार चौरस फूटचा शेड तयार करण्यात आला आहे. याशिवाय १२ हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे. भाविकांच्या रांगेत मजबूत रेलींग, पिण्याच्या पाणी, पंख्यांची सोय केली आहे. सध्या उन्हाळ्यात दिवस असल्याने दर्शन रांगेच्या मंडपात वरच्या भागाला छोटेखानी कारंजे लावण्यात आले आहे. यातून पाण्याचे बारिक फव्वारे अंगावर उडत असल्याने भाविकांना गारवा मिळत आहे.