शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

कार, दुमजली घर, प्लॉट असणाऱ्यांनाही हवे घरकुल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 05:00 IST

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करणाऱ्या ३२ हजार ६८   जणांकडे चारचाकी वाहन, दुमजली किंवा सुस्थितीतील घर, बँकेत ठेवी, जंगम मालमत्ता, तीन एकरहून अधिक शेतजमीन, प्लॉट व अन्य मालमत्ता आहे. अर्जदारांची ही माहिती जाणून घेण्यासाठी आधार लिंकचा वापर करण्यासोबतच प्रत्यक्षात घरी जाऊन पाहणी केल्याने बनावटपणा उघडकीस आला. जिल्ह्यातील पात्र अर्जदारांची पडताळणी जॉबकार्ड मॅपच्या सहाय्याने केली जात  आहे. 

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने स्वीकारलेल्या अर्जांची आधार लिंकने पडताळणी केली असता, जिल्ह्यातील तब्बल ३२ हजार ६८ अर्जदार आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असल्याचे उघडकीस आले. परिणामी, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनाने हे अर्ज अपात्र ठरविले आहे. प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना सन १९९५-९६ पासून राबविली जात आहे. ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील बेघर व कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे. यापूर्वी लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतमार्फतच केली जात होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे.  योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असावा, कायम प्रतीक्षा यादीत नाव आणि घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा व तत्सम अन्य सर्वसाधारण अटी आहेत. घरकुल अनुदान व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ९०-९५ दिवसांच्या अकुशल मजुरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य व घरकुल लाभार्थ्यांना स्वच्छतागृहासाठी स्वतंत्र निधी दिला जातो. या योजनेमुळे हजारो गरिबांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

पात्र अर्जदारांचे जॉबकार्ड मॅपिंग सुरू- प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करणाऱ्या ३२ हजार ६८   जणांकडे चारचाकी वाहन, दुमजली किंवा सुस्थितीतील घर, बँकेत ठेवी, जंगम मालमत्ता, तीन एकरहून अधिक शेतजमीन, प्लॉट व अन्य मालमत्ता आहे. अर्जदारांची ही माहिती जाणून घेण्यासाठी आधार लिंकचा वापर करण्यासोबतच प्रत्यक्षात घरी जाऊन पाहणी केल्याने बनावटपणा उघडकीस आला. जिल्ह्यातील पात्र अर्जदारांची पडताळणी जॉबकार्ड मॅपच्या सहाय्याने केली जात  आहे. 

एनआयसीने राजकीय हस्तक्षेपाला चाप  

जि. प. अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने दोन वर्षांपासून गरजु नागरिकांकडून अर्ज मागविले होते. यादी केंद्र सरकारच्या एनआयसी प्रणालीत अपलोड करण्यात आली. यंत्रणेने संबंधितांच्या घरी जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हा यंत्रणेने पाहणी करून छायाचित्र अपलोड केले असता, चंद्रपूर जिल्ह्यातील ३२ हजार ६८ अर्जदार श्रीमंत आढळले.  केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना आता राजकीय हस्तक्षेप करण्यासही चाप बसला, असा दावा जि. प. प्रशासनाने केला आहे.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना