शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

‘त्या’ दोन योजनांनी बदलविले 24 हजार रुग्णांचे आयुष्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. तर आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही केंद्र सरकारची आरोग्य विमा योजना असून, २३ सप्टेंबर २०१८ पासून राज्यात लागू  आहे. सुधारित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसोबत केंद्राची आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राज्यात १ एप्रिल २०२० पासून एकत्रित लागू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र व राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत  चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत २४ हजार ५१ रुग्णांना दुर्धर आजारासाठी स्वत:जवळचा एकही पैसा खर्च न करता मोफत उपचार मिळाले आहेत. त्यांच्या उपचाराची ५० कोटी ४५ लाख ४१ हजार २७५ रुपयांची रक्कम शासनाने जमा केली आहे.महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. तर आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही केंद्र सरकारची आरोग्य विमा योजना असून, २३ सप्टेंबर २०१८ पासून राज्यात लागू  आहे. सुधारित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसोबत केंद्राची आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राज्यात १ एप्रिल २०२० पासून एकत्रित लागू झाली आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात दोन्ही योजनेंतर्गत आतापर्यंत २५ हजार ५१ रुग्णांच्या उपचारासाठी शासनाने ५० कोटी ४५ लाख ४१ हजार २७५ रुपये खर्च केले आहे. लाभ घेणाऱ्या रूग्णांत शहरी व ग्रामीण भागाचा समावेश   आहे.

सर्वाधिक ७८४६ रुग्ण मेडिकल ऑन्कॉलॉजीचेमेडिकल ऑन्कॉलॉजीचे सर्वाधिक ७८४६, नेफ्रॉलॉजी  १६५५, न्युरॉलॉजी १८४, न्युरोसर्जरी ४५८, ॲपथमॅलॉजी सर्जरी १०१४, आर्थोपेडिक सर्जरी ८६६, पेडियाट्रिक कॅन्सर ७, पेडियाट्रिक सर्जरी ३१८, पेडीयाट्रिक्स मेडिकल मॅनेजमेंट ४७३, प्लास्टिक सर्जरी ७, पॉलीट्रॉमा २०७६, प्रोस्थेसेस ४, पलमनोलॉजी १८६५, रेडीएशन ॲन्कोलॉजी १३२६, हृयुमॅटोलॉजी १, सर्जकल गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी ३७ आणि सर्जिकल अँकोलॉजीचे उपचार १ हजार ५७ अशा एकूण २४ हजार ९५१ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.

रुग्णांना मिळालेले उपचार व शस्त्रक्रिया जळालेले केसेस २९ रुग्ण, कार्डियाक अँड कॉर्डियोथेरॉयिक सर्जरी ५७७ रुग्ण, कार्डिओलॉजी १२५९, क्रिटिकल केअर ७४, डरमॅटोलॉजी २२, ईएनटी सर्जरी ३५७, एन्डोक्रिनोलॉजी १३४, जनरल मेडिसीन ५९, गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी १३५, जनरल सर्जरी ८३४, गॅयनोकॉलॉजी अँड ॲबस्टेस्ट्रिक सर्जरी ३७६, जेनिटोरीनरी सर्जरी ५२४, हेमॅटोलॉजी २४, इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी १६५ व २८८ जणांवर इनव्हेंस्टिगेशनसाठी मोफत उपचार करण्यात आला. दोन्हीही योजनांत ५० पेक्षा जास्त आजारावर मोफत उपचार केला जातो.

 

टॅग्स :Healthआरोग्यgovernment schemeसरकारी योजना