ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची कोविडबाबत आरटीपीसीआर चाचणी करण्याचे निर्देश आहेत. तपासणीच्या तारखाही निर्धारित करण्यात आल्या आहेत. ज्यांची आरटीपीसीआर चाचणी अहवाल प्राप्त होणार नाही त्यांची हजेरी गृहित धरली जाणार नाही, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. २३ नोव्हेंबर २०२० पासून शाळा सुरू करण्याच्या शासन निर्देशानुसार संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोविड १९ चाचण्या करण्यात आल्या. तसा अहवाल मुख्याध्यापकांमार्फत शिक्षणाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचला. सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक कर्तव्यावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पुन्हा नव्याने आरटीपीसीआर चाचणी करण्यात येऊ नये, याकडे निवेदनातून लक्ष वेधले आहे. शिष्टमंडळात शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुरेश डांगे, चिमूर तालुकाध्यक्ष रावन शेरकुरे, सुरज तिडके, राकेश पंधरे, दीपांकर धोटे, विलास गजभिये, किशोर मेश्राम यांचा समावेश होता.
‘त्या’ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पुन्हा कोरोना चाचणी नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST