शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कवी व कुलगुरुंवर कठोर कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 22:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात आदिवासी महिलांविषयी अश्लिल मजकुराचा उल्लेख करणाऱ्या ‘त्या’ कवीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.मुंबई विद्यापिठातील अभासक्रमात कवी दिनकर मनवर यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या पुस्तकातील ‘पाणी कसं असतं’ या कवितेत मुलनिवासी समाजाच्या ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : वसतिगृहातील मुला-मुलींची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात आदिवासी महिलांविषयी अश्लिल मजकुराचा उल्लेख करणाऱ्या ‘त्या’ कवीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.मुंबई विद्यापिठातील अभासक्रमात कवी दिनकर मनवर यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या पुस्तकातील ‘पाणी कसं असतं’ या कवितेत मुलनिवासी समाजाच्या मुलींविषयी अश्लिल व आक्षेपार्र्ह शब्दप्रयोग करून एक वाईट मानसिकता असलेल्या लेखकाच्या कवितेला मुंबई विद्यापीठाने मान्यता दिली. मुलींविषयी व स्त्रियांविषयी वाईट विचार ठेवणाऱ्या आणि विशिष्ट समाजाच्या मुलींवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या संबंधित कवी दिनकर मनवर, कुलगुरू तसेच कुलसचिव यांच्यावर विविध कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी मोना घरत, रोशनी गेडाम, पंकज सिडाम, सुरज निमसरकार, आकाश गेडाम, कंटू कोटनाके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.भद्रावतीत तहसीलदारांना निवेदनभद्रावती : मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.च्या तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात आदिवासी मुलींची मानहाणी करणारे वर्णन केले आहे. त्यामुळे कवी दिनकर मनवर, कुलगुरु, कुलसचिवांवर कारवाई करावी, अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा गोंडी धर्मीय आदीवासी एकता संघटनेतर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद गेडाम, युवा आदिवासी नेते रमेश मेश्राम, गोलु गेडाम, माजी पं.स. सदस्य सुधाकर आत्राम, नरेश गेलाम, महादेव सिडाम, विनोद शेडमाके, निलेश गेडाम, दुशाल सिडाम, प्रमोद नागोसे, दिलीप मडावी, नगरसेविका अनिता मुडे (गेडाम), माला गेडाम, भाग्यश्री गेडाम, रत्ना सिडाम, पोर्णिमा गेडाम आदी उपस्थित होते.