शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेलच्या पाण्यावर भागते तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:27 IST

राजुरा तालुक्यातील ३२५ लोकसंख्या असलेल्या निर्ली गावातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने नागरिकांची तहान भागविणाऱ्या सरकारी बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्या. गावात पाण्याचे संकट उभे राहिल्याने नागरिकांना नाईलाजाने शेतातील बोअरवेलचे पाणी आणावे लागत असल्याने निर्लीवासीयांची रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.

ठळक मुद्देनिर्लीवासीयांची व्यथा : परिसरातील भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत आटले

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा तालुक्यातील ३२५ लोकसंख्या असलेल्या निर्ली गावातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने नागरिकांची तहान भागविणाऱ्या सरकारी बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्या. गावात पाण्याचे संकट उभे राहिल्याने नागरिकांना नाईलाजाने शेतातील बोअरवेलचे पाणी आणावे लागत असल्याने निर्लीवासीयांची रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.चार्ली ग्राम पंचायत अंतर्गत येणाºया निर्ली गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटले आहे. गावाला पाणीपुरवठा करणाºया नळयोजनेची विहिरी आटली आहे. गावात चार सरकारी हातपंप तर एक विहिर आहे. परंतु पाण्याची पातळी खाली गेल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी रखरखत्या उन्हात भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता निर्ली येथील सरपंच पोर्णिमा प्रदिप दुबे यांनी गावालगत असलेल्या प्रमोद धांडे यांच्या शेतातील बोअरवेलवरून गावकऱ्यांना पाण्याची सोय करून दिली आहे. आजघडीला शेतातील या एका बोअरवेलवरून अख्खा गाव पाणी भरत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत प्रमोद धांडे यांनी गावकºयांच्या सोयीसाठी पाणी उपलब्ध करून दिल्याने गावकरी या बोअरवेलच्या पाण्यावर आपली तहान भागवित आहे. पाणी टंचाईने ग्रस्त झालेल्या गावांकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने निर्लीवासीयांना ४७ अंश सेल्सीअसच्या उष्ण तापमानात शेतातील बोअरवेलवरून पाणी आणण्याचा दुर्दैवी वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्लीवासियांसाठी पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करून द्यावी अशी मागणी गट ग्राम पंचायत निर्लीच्या सरपंच पौर्णिमा दुबे, भाऊराव क्षीरसागर, प्रदिप दुबे, केतन धांडे, सुनिल वनकर, आकाश धांडे, रविंद्र दुबे, मंजुळाबाई धांडे, बाळा धांडे, गिताबाई धांडे, सुनिल धांडे यांनी केली आहे.निर्ली गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता गावाशेजारील शेतातील एका बोअरवेलवरून गावकºयांच्या पाण्याची तात्पुरती सोय करून दिली आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गावाकडे लक्ष देवून नागरिकांच्या पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करून द्यावी.-पौर्णिमा दुबेसरपंच, गट ग्रामपंचायत निर्ली

टॅग्स :water shortageपाणीटंचाई