शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पथदिवे बंद असल्याने चोऱ्या वाढल्या

By admin | Updated: July 3, 2016 01:03 IST

शहरात रात्रीच्या सुमारास प्रकाश राहावा, यासाठी रस्त्यारस्त्यावर पथदिवे लावण्यात आले आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : तक्रारी करूनही कुणी लक्ष देईना !सिंदेवाही : शहरात रात्रीच्या सुमारास प्रकाश राहावा, यासाठी रस्त्यारस्त्यावर पथदिवे लावण्यात आले आहे. मात्र अनेक रस्त्यावरील पथदिवे सध्या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शहरात चोरी, गुन्हेगारीच्या घटनात वाढ झाली आहे. पथदिवे बंद असल्याने गुन्हेगारांना गुन्हा करणे सोयीचे होत आहे. मात्र, नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने पथदिवे दुरुस्तीसाठी कोणतेच पाऊल उचलले जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.नगरात सोई-सुविधा पुरविण्याची जबाबदारी स्थानिक नगरपंचायत प्रशासनाची आहे. सुविधा देवून त्या बदल्यात कर घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, लाखो रुपयांचा कर वसूल करणारे प्रशासन नागरिकांना सुविधा देताना आखडता हात घेत आहे. एखादा गुन्हा घडविण्यापूर्वी गुन्हेगार सावधगिरी बाळगत असतो. नेहमी अंधाराचा फायदा घेवून चोरी व अन्य घटना घडवून आणल्या जातात. मागील काही दिवसांपासून येथील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे चोरट्यांना मोकळे रान झाले आहे.राजकीय पुढारी आपल्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील दिवे बंद राहिल्यास तक्रारी करतात. या तक्रारींची तातडीने दखल घेतली जाते. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविली जात आहे. दिवाबत्ती करापोटी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, तक्रारी करूनही त्यावर उपाययोजना करावी कुणाकडे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वीज वितरण कंपनीकडे तक्रार केल्यास ते नगर पंचायत प्रशासनाकडे बोट दाखवून मोकळे होतात.चोरीच्या घटना घडू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, घराबाहेरील दिवे रात्रभर सुरू ठेवावे, असे आवाहन पोलीस विभागाकडून केले जाते. मात्र, नगर पंचायत प्रशासनच पोलीस विभागाच्या आवाहनाला हरताळ फासत आहे. (शहर प्रतिनिधी)