शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे अनेकांनी जपून ठेवल्या लॉकरमध्येच अस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 20:52 IST

लॉकडाऊनमुळे कुटुंबीयांची इच्छा असतानाही धार्मिक स्थळी अस्थी नेण्यावर निर्बंध आले. त्यामुळे काही कुटुंंबीयांनी आप्तेष्टांच्या स्मृती जपण्यासाठी लॉकरमध्ये अस्थी जपून ठेवल्या तर काहींनी सोयीनुसार अस्थी विसर्जन करून कार्यक्रम आटोपता घेत आहेत.

ठळक मुद्देअस्थी विसर्जनास अडचणीपरवानगीचा ससेमिरा

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करून काही कुटुंबीय विविध धार्मिक ठिकाणी अस्थी विसर्जनासाठी घेऊन जातात. मात्र लॉकडाऊनमुळे कुटुंबीयांची इच्छा असतानाही धार्मिक स्थळी अस्थी नेण्यावर निर्बंध आले. त्यामुळे काही कुटुंंबीयांनी आप्तेष्टांच्या स्मृती जपण्यासाठी लॉकरमध्ये अस्थी जपून ठेवल्या तर काहींनी सोयीनुसार अस्थी विसर्जन करून कार्यक्रम आटोपता घेत आहेत. चंद्रपूर शहरातील शांती धाममध्येही परवागनीविना काही व्यक्तींच्या अस्थी लॉकरमध्ये जपून ठेवण्यात आल्या आहेत.मृत्यूनंतर अस्थी विसर्जन करण्याच्या विविध धर्मांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रथा-परंपरा पाळताना मोठी अडचण निर्माण झाली आहे. सर्वसाधारणपणे विदर्भात वर्धानदीच्या वढा संगम, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा येथील वैनगंगा नदी व माहूर येथेही अस्थी विसर्जन करण्यासाठी नेल्या जाते. मात्र लॉकडाऊनमुळे बंधने आली. बाहेर गावी जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागत असल्याने अस्थीचे विसर्जन कुठे करावे, हा प्रश्न कुटुंबीयांना पडला आहे. काहींनी आपल्या आप्तेष्टांच्या स्मृती जपण्यासाठी लॉकडाऊन संपेपर्यंत स्मशानघाटातील लॉकरमध्ये अस्थी सुरक्षित ठेवल्या आहेत. चंद्रपूर शहरातील शांतीधाममध्ये अस्थी ठेवण्यासाठी १६ लॉकरची व्यवस्था आहे. या लॉकरमध्ये सध्या १० अस्थी ठेवल्या आहेत. लॉकडाऊनपूर्वी या लॉकरमध्ये एक किंवा दोन दिवसच अस्थी ठेवल्या जात होत्या. काही कुटुंब अस्थी विसर्जन करण्यासाठी प्रशासकीय परवानगी मागत असून परवानगी मिळाल्यानंतरच त्या अस्थी येथून नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.इरईच्या पात्रात अस्थीचे विसर्जनलॉकडाऊन व शासकीय परवानगीचा ससेमीरा टाळण्यासाठी काही कुटुंबीय इरई नदीच्या पात्रात अस्थी कलशाचे विसर्जन करीत आहे. यात वेळ व पैशाचीही बचत होत आहे. काही जण सोयीनुसार आपआपल्या पद्धतीने अस्थीचे विसर्जन करीत आहेत.लॉकडाऊनपूर्वी शांतीधाममध्ये असलेल्या लॉकरमध्ये एक किंवा दोन दिवस अस्थी ठेवल्या जात होत्या. मात्र सध्या अस्थी ठेवण्याच्या कालावधीत वाढ झाली आहे. अनेक जण आपल्या इच्छेनुसार अस्थीकलशचे विसर्र्जन करतात. मात्र आता ये-जा करण्याची परवानगी घ्यावी लागत असल्याने निर्बंध आले आहे.- नरेंद्र गर्गेलवार,टालव्यवस्थापक, शांतीधाम चंद्रपूर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस