शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ते जगत आहेत उघड्यावरचे जीवन

By admin | Updated: August 19, 2015 01:19 IST

गरीब असो वा श्रीमंत घर ही प्रत्येकाची गरज आहे. शासनाने कानपा येथील आदिवासीची १९८४ मध्ये ही गरज पूर्ण केली.

१९८४ मध्ये मिळालेले घरकूल झाले नामशेष : देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्षघनश्याम नवघडे नागभीडगरीब असो वा श्रीमंत घर ही प्रत्येकाची गरज आहे. शासनाने कानपा येथील आदिवासीची १९८४ मध्ये ही गरज पूर्ण केली. पण त्यानंतर शासन आपले कर्तव्य विसरले. डागडूजीअभावी ही संपूर्ण घरे नामशेष झालीत आणि या आदिवासींच्या नशिबी उकिरड्यावरचे जीणे वाट्याला आले.चंद्रपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांना जोडणारे हे गावे नागभीड नागपूर राज्यमहामार्गावर आहे. गावाची लोकसंख्या अडीच ते तीन हजाराच्या आसपास असून आदिवासींची लोकसंख्या एक हजाराच्या दरम्यान आहे. या आदिवासीसाठी १९८४ मध्ये इंदिरा आवास योजनेतून घरकुल योजना राबविण्यात आली. जवळपास ६२ घरकुल या आदिवासींना देण्यात आले. तत्कालिन खासदार विलास मुत्तेमवार आणि आमदार बाबासाहेब खानोरकर यांच्या हस्ते या घरकुलांचे लोकार्पण करण्यात आले. १० ते १५ वर्षे या घरकुलांची स्थिती बरी होती. पण नंतर या घरकुल योजनेला घरघर लागणे सुरु झाले. ही घरे पडायला सुरुवात झाली. घरे पडू लागल्याने या लाभार्थ्यांनी संबंधित यंत्रणेकडे घरांच्या डागडुजीसाठी अर्ज केलेत. पण कोणतीही मदत त्यांना देण्यात आली नाही. या योजनेत डागडुजीटे प्रावधानच नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. आता ही घरे पूर्णत: नामशेष झाली असून हे सर्व लाभार्थी घरांच्या अंगणातच पाल टाकून आपले जीवन कंठत आहेत.शासनाकडून एकदा या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला असल्याने नवीन घरकुल योजनेसाठी ते आता कायमचे अपात्र झाले आहेत. अनेकदा या लाभार्थ्यांनी नवीन घरकुलासाठी अर्ज केले. पण त्यांना लाभ मिळाला असल्याचे सांगून लाभ नाकारण्यात आला. सदर प्रतिनिधीने या वस्तीला भेट दिली असता, ही वस्ती विविध समस्यांचे माहेरघर बनली असल्याचे निदर्शनास आले.या लोकांना शेती नसल्याने ते नेहमीच फिरस्तीचे व्यवसाय करतात. देवी देवतांचे फोटो विकणे, खारका मनुकांची गावोगावात फिरुन विक्री करणे हा या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.आपल्या व्यथा कथन करताना या लोकांनी सांगितले की, हिवाळा आणि उन्हाळ्यात आम्ही कसेही दिवस काढतो. पण पावसाळ्यात मात्र आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. थोडासा जरी पाऊस आला तरी झोपड्यांमध्ये पाणी घुसत असल्याने अन्न धान्य व कपडे भिजून जात असतात. शिवाय साप विचवांची भिती वेगळीच असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या व्यवसायातून आमचे पोटच भरत नाही. मग घराच्या दुरूस्तीसाठी पैसे आणायचे कुठून, असा या नागरिकांचा सवाल आहे. नवीन घर बांधण्याची आमच्यात शक्ती नाही. शासनाने आमची चौकशी जरुर करावी आणि आम्हाला घरकुलाचा लाभ पुन्हा एकदा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ग्रामपंचायतीनेही आदिवासीच्या वस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. या वस्तीत रस्त्याची व्यवस्था सुस्थितीत असली तरी नाल्या मात्र तयार करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरच जिरत असते किंवा वाहत असते. या वस्तीतच अंगणवाडी आहे. एक स्वच्छतागृह बांधण्यात आले असले तरी ते सुद्धा मोडकळीस आले आहे. त्यामुळे अंगणवाडीतील मुले उघड्यावरच विधी उरकत असतात.