शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

त्यांनाही हवे वैवाहिक जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:05 IST

एचआयव्ही (एड्स) बाधितांनी उपचार घेतले. त्यामुळे त्यांच्यात सकारात्मक बदल झाला, आत्मविश्वास वाढला आहे. आता, त्यातील काहींची पुढची पायरी त्यांना जीवनसाथी मिळावे, वैवाहिक जीवन प्रारंभ व्हावा, अशी अपेक्षा आहे.

ठळक मुद्दे६२ जणांचा परिचय : एचआयव्ही बाधितांकरिता वर-वधू परिचय मेळावा

बल्लारपूर : एचआयव्ही (एड्स) बाधितांनी उपचार घेतले. त्यामुळे त्यांच्यात सकारात्मक बदल झाला, आत्मविश्वास वाढला आहे. आता, त्यातील काहींची पुढची पायरी त्यांना जीवनसाथी मिळावे, वैवाहिक जीवन प्रारंभ व्हावा, अशी अपेक्षा आहे.त्यांच्या या अपेक्षेची दखल सेवाभावी आणि सामाजिक संस्थांनी घेतली. त्यांच्या पुढाकाराने नुकताच एचआयव्ही बाधीत व आता पूर्ण बरे झालेल्यांकरिता वर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन येथील बल्लारपूर पेपर मिल कॉलनीतील आॅडिटोरियम हॉलमध्ये करण्यात आले होते. या मेळाव्यात २५ महिला व ३७ पुरुषांनी आपला परिचय देऊन आपला जीवनसाथी कसा असावा, ही अपेक्षा व्यक्त केली.परिचय देणाऱ्यात २० ते ४५ वर्षे पर्यंतचे स्त्री-पुरुष होते. यातील काही अविवाहित तर काहींचे पूर्वी लग्न झालेले व घटस्फोटीत होते. या मेळाव्याचे आयोजन किरण ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर, विहान प्रकल्प, शिवार संस्था चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.मेळाव्याचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोविंदा वनकर तर प्रमुख अतिथी म्हणून बिल्ट ग्राफीक्सच्या वरिष्ठ अधिकारी सुचेता ठावरी, जेष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, एड्स नियंत्रणाचे जिल्हा परिवेक्षक निरंजन मंगरूळकर, समुदाय देखभाल समन्वयक हेमचंद उराडे, जिल्हा महिला बालकल्याण संरक्षण अधिकारी प्रिती उंदीरवाडे यांची उपस्थिती होती.यावेळी बल्लारपूर कार्यालयाकडून एचआयव्ही बाधिताना देण्यात येत असलेल्या शासकीय मदतीची माहिती दिली. संचालन विशाल पावडे यांनी तर आभार संगीता रोहणकर यांनी मानले.