शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
7
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
8
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
9
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
10
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
11
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
12
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
13
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
14
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
15
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
16
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
17
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
18
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
19
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
20
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान

हेल्पलाईनवरील १४५ तक्रारींचा होणार निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

निवडणूक प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणणे आणि मतदारांच्या निवडणूक संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी निवडणूक आयोगाने १९५० हेल्पलाइन निर्माण केली आहे. या हेल्पलाईन अंतर्गत राज्यस्तरावर राज्य संपर्क व जिल्हा संपर्क केंद्र्र स्थापन करण्यात आले. २९ सप्टेंबर २०१९ पर्यंत सदर हेल्पलाइनवर १४५ तक्रारी प्राप्त झाल्या असून लवकरच निपटारा केल्या जाणार आहे.

ठळक मुद्देनियोजन भवनात कक्ष : फोनवर मिळते मतदान केंद्राची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : निवडणूक प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणणे आणि मतदारांच्या निवडणूक संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी निवडणूक आयोगाने १९५० हेल्पलाइन निर्माण केली आहे. या हेल्पलाईन अंतर्गत राज्यस्तरावर राज्य संपर्क व जिल्हा संपर्क केंद्र्र स्थापन करण्यात आले. २९ सप्टेंबर २०१९ पर्यंत सदर हेल्पलाइनवर १४५ तक्रारी प्राप्त झाल्या असून लवकरच निपटारा केल्या जाणार आहे.चंद्र्रपूर शहरात १९५० हेल्पलाईन व मदत केंद्राचे स्वतंत्र कक्ष जिल्हा नियोजन भवनात स्थापन करण्यात आले. या टोल फ्री हेल्पलाईनवर २४ तास माहिती दिली जाते. नागरिकांना निवडणूक व मतदानासंबंधीची सविस्तर माहिती मिळविता येते. मतदारांच्या विविध शंकांचे समाधान केल्या जाते. मतदान यादीत नाव नोंदवणे, मतदान ओळखपत्र मतदान अर्ज निगडीत सर्व माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपले मतदान कक्ष कुठे याची खात्री करण्यासाठी हेल्पलाईनचा उपयोग होतो. मतदानाच्या दिवशी गोंधळ उडू नये, यासाठी हेल्पलाईनचा वापर करावा. या हेल्पलाइनच्या सहाय्याने मतदार नोंदणीसाठी संबंधीतांना अधिकृत माहिती मिळवणे सोपे झाले आहे. मतदान यादीतील त्यांच्या वैयक्तिक माहितीचा तपशील, मतदान केंद्र, बूथ लेव्हल अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे संपर्क क्रमांक याविषयी मतदार हेल्पलाइन, मोबाइल अ‍ॅप किंवा १९५० हेल्पलाइनवर फोन करून मिळविता येते. नागरिकांनी या हेल्पलाइनचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.सोशल मीडियावर ‘इलेक्शन फिव्हर’वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात एकीकडे ‘व्हायरल फिव्हर’ ची साथ तर दुसरीकडे सहाही विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या समर्थकांमध्ये इलेक्शन फिव्हर चढल्याचे दिसून येत आहे. संभाव्य व घोषित उमेदवारांचे समर्थक सोशल मीडियावर विजयाचे दावे-प्रतिदावे करीत आहेत. काही समर्थकांनी उमेदवारांच्या नावाने फेसबुकवर पेजेस तयार केले आहेत. त्यावर दररोजच्या कार्यक्रमाची व दौऱ्याची इत्यंभूत माहिती टाकत आहे. त्यामुळे या चर्चांना मोठी रंगत आली आहे.ग्रामपंचायत कार्यालयातही पाहता येतात मतदार याद्याजिल्ह्यात २१ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार असून सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या २४ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध झाले. राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर व वरोरा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या याद्या सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगर परिषद नगरपंचायत, ग्रामपंचायत कार्यालय व मतदान केंद्रांवर पाहता येणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक