शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पाच सोनोग्राफी व चार गर्भपात केंद्रांचे धाबे दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 05:00 IST

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत २० जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत प्रत्येकी तीन सदस्यांच्या एकूण चार समित्या गठित करून जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या  मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील ५० सोनोग्राफी केंद्र व ३३ गर्भपात केंद्रांच्या तपासणीचा कृती कार्यक्रम तयार करण्यात आला. ज्या तालुक्यात सोनोग्राफी व गर्भपात केंद्र अस्तित्वात आहे, त्या सर्व केंद्रांना भेटी देऊन पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्यानुसार सखोल तपासणी करण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वर्धा जिल्ह्यातील अवैध गर्भपात प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने सोनाग्राफी केंद्र व गर्भपात केंद्रांची तपासणी मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान त्रुटी आढळलेल्या पाच सोनोग्राफी आणि चार गर्भपात केंद्रांस नोटीस बजावली तर  एक गर्भपात केंद्रांची परवागनी तात्पुरते निलंबित करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत २० जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत प्रत्येकी तीन सदस्यांच्या एकूण चार समित्या गठित करून जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या  मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील ५० सोनोग्राफी केंद्र व ३३ गर्भपात केंद्रांच्या तपासणीचा कृती कार्यक्रम तयार करण्यात आला. ज्या तालुक्यात सोनोग्राफी व गर्भपात केंद्र अस्तित्वात आहे, त्या सर्व केंद्रांना भेटी देऊन पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्यानुसार सखोल तपासणी करण्यात आली. या मोहिमेंतर्गत त्रुटी आढळल्यामुळे पाच सोनोग्राफी केंद्र आणि चार गर्भपात केंद्रास नोटीस बजावण्यात आली तर एक गर्भपात केंद्र तात्पुरते निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सोनाग्राफी व गर्भपात केंद्र चालवणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले.

चंद्रपुरातील आणखी काही केंद्र प्रशासनाच्या रडारवरचंद्रपुरात गत पाच वर्षांत सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची संख्या वाढली. मात्र, काही डॉक्टरांनी पैशाच्या लोभापाई अवैध गर्भपात व सोनोग्राफी करीत असल्याची शंका आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एक प्रकरण उघडकीस आल्यानंतर चंद्रपुरातही असे प्रकरण घडत असल्याच्या चर्चेला पेव फुटले होते. २० जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२२ या तपासणी मोहीम झाली असली तरी काही केंद्र प्रशासनाच्या रडारवर आहेत.   

त्रुटींची पुर्तता न केल्यास कारवाई- सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांनी त्रुटींची पूर्तता करण्याची नोटीस बजावण्यात आली. - विहित कालावधीत या केंद्रांकडून समाधानकारक पूर्तता केली नाही तर आणखी कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने केल्या आहेत.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल