शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

असहिष्णुता देशात कधी नव्हती ?

By admin | Updated: January 10, 2016 00:53 IST

देशात असहिष्णुता या विषयावर ओरड होऊन त्या संदर्भात बऱ्याच साहित्यकारांनी आपले पुरस्कार परत करण्याची मोहीमच उघडली होती.

वीरा साथीदार यांचा सवाल : ‘कोर्ट’ आॅस्करमधून बाद होण्याचे कारण आर्थिक बाजूवसंत खेडेकर बल्लारपूरदेशात असहिष्णुता या विषयावर ओरड होऊन त्या संदर्भात बऱ्याच साहित्यकारांनी आपले पुरस्कार परत करण्याची मोहीमच उघडली होती. विरोधी पक्षाने सत्तापक्षाला संसदेत धारेवर धरले होते. काही तरी विषय हवा म्हणून विरोधकांनी हा विषय उचलून धरला. वस्तुत: युद्ध, जातीय तेढ, हिंसा इत्यादी असहिष्णुतेचे वातावरण आपल्या देशात आजचे नव्हे, तर अनेक काळापासून आहे. त्यामुळे, असहिष्णुता हा वादाचा वा विरोधाचा मुद्दा होऊ शकत नाही, असे परखड व स्पष्ट मत ‘कोर्ट’ या गाजलेल्या आणि आॅस्करवारी करून आलेल्या चित्रपटाचे नायक वीरा साथीदार यांनी मांडले.साथीदार हे एका कार्यक्रमानिमित्त बल्लारपुरात आले असता ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला. कुणाला चांगले वाटो वा वाईट, मी स्पष्ट बोलतो, असे स्वत:बद्दल सांगत ते म्हणाले, मी डॉ.बाबासाहेबांच्या चळवळीतून घडत आलो आहे. वैचारिक व क्रांतिकारी विचाराच्या पथनाट्यातून अभिनयाचे धडे मिळाले. विनायक कऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनात अभिनयाचे गुण पक्के झाले. सुप्रसिद्ध समाजसेवी अ‍ॅड. सुबत अब्राहम यांच्या माध्यमातून कोर्ट चित्रपटामध्ये निर्माता-दिग्दर्शक व लेखक चैतन्य ताम्हणे (मुंबई) यांनी मला अभिनय करण्याची संधी दिली. त्याचे सोने केले आणि मला भरपूर नाव मिळाले. या चित्रपटाच्या विविध अंगासोबत मला अभिनयाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कितीतरी पुरस्कार मिळाले. विषय नवा, मांडणी उत्तम आणि सर्वच कलावंतांचा जिवंत अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू ठरली आणि त्यामुळेच हा चित्रपट चर्चेला आला, प्रशंसा लाभली आणि आॅस्करपर्यंत जाऊन आला, असे तो म्हणाला.कोर्टातील वास्तव चित्र, त्यातील व त्यासंबंधी घडामोडी यामुळे हा वास्तववादी चित्रपट नावीन्यपूर्ण आणि जरा हटके ठरला. हा चित्रपट प्रारंभी विदेशात १९ देशांमध्ये प्रदर्शित झाला. एकूण १९ पुरस्कार त्याला मिळाले. त्यानंतर तो भारतात प्रदर्शित झाला. परंतु वितरकाच्या अडचणीमुळे हा चित्रपट अजूनही बऱ्याच ठिकाणी पोहचला नाही. याचे दु:ख वाटते. कोर्ट चित्रपट भारताकडून आॅस्कर स्पर्धेकरिता गेला, पण तो पहिल्या फेरीतच बाद झाला. यावर साथीदार म्हणाले, आॅस्करमध्ये एकूण १५०० ज्युरी (परीक्षक) असतात. त्या साऱ्यांना चित्रपट दाखविणे व तेही स्वत:च्या खर्चाने, हे आवश्यक असते. त्याची व्यवस्था करण्याकरिता खर्च लागतो. भारत सरकार तो खर्च उचलत नाही. आपण आर्थिकदृष्ट्या टिकू शकत नाही, अशी खंतही साथीदार यांनी व्यक्त केली.मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातला नागपूरचा रहिवाशी. ‘कोर्ट’ला आणि मला अभिनयाचे कितीतरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्याची सर्वत्र चर्चा झाली. लहान थोरांनी सर्वच क्षेत्रातील लोकांनी अभिनंदन केले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी दखल घेतली नाही, याचे वाईट वाटते. -वीरा साथीदार , चित्रपट कलावंत