शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

कौशल्य विकास विद्यापीठासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे असावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 23:15 IST

कौशल्य विकास विद्यापीठांची रचना आणि त्यांच्या गरजा या सर्वसाधारण विद्यापीठांपेक्षा वेगळ्या असल्याने युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशनची सर्वसाधारण विद्यापीठांसाठी असलेली मार्गदर्शक तत्त्वे जशीच्या तशी कौशल्य विकास विद्यापीठांना लागू करता येणार नाहीत.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : विद्यापीठाच्या कामाचा आढावा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : कौशल्य विकास विद्यापीठांची रचना आणि त्यांच्या गरजा या सर्वसाधारण विद्यापीठांपेक्षा वेगळ्या असल्याने युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशनची सर्वसाधारण विद्यापीठांसाठी असलेली मार्गदर्शक तत्त्वे जशीच्या तशी कौशल्य विकास विद्यापीठांना लागू करता येणार नाहीत. युजीसीने कौशल्य विकास विद्यापीठासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत, त्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.काल चंद्रपूर कौशल्य विकास विद्यापीठाच्या कामाचा प्रगती आढावा अर्थमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, वन विभागाचे सचिव विकास खारगे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक जीत सिंग, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. शे.ही. पाटील, आयुक्त (कौशल्य विकास) ई. रविंद्रन, वन अकादमीचे संचालक अशोक खडसे आदी उपस्थित होते. कुशल आणि रोजगारयुक्त भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्नं असून ते गतीने साध्य करण्यासाठी कौशल्य विकास विद्यापीठाचे काम गतीने पुढे जायला हवे, असे सांगून ना. मुनगंटीवार म्हणाले, ही विद्यापीठे स्थापन करताना येणाऱ्या अडचणींचा सर्वंकष अभ्यास करून कौशल्य विकास विभागाने मार्गदर्शक तत्वांचा कच्चा मसुदा तयार करावा. पंतप्रधान आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री यांची वेळ घेऊन आपण त्यांच्यासमोर महाराष्ट्राचे हे सादरीकरण येत्या पंधरा दिवसात करू, असेही ते म्हणाले. देशात गुजरात, ओडिसा, हरियाणा आणि राजस्थान येथे कौशल्य विकास विद्यापीठे कार्यरत आहेत. या विद्यापीठांची स्थापना, त्यांना येणाºया अडचणी याचाही या सादरीकरणापूर्वी अभ्यास केला जावा, असेही ते म्हणाले.कृषी विद्यापीठे ज्याप्रमाणे कृषी विभागांतर्गत येतात, त्याचप्रमाणे कौशल्य विकास विद्यापीठे ही कौशल्य विकास विभागांतर्गत यावीत. यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देऊन ते म्हणाले, ग्रामविकास, महिला व बाल विकास, कौशल्य विकास विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यासारख्या अनेक विभागांकडून कौशल्य विकासाच्या योजना राबविल्या जातात. या योजनांचे एकत्रिकरण करून त्या एकाच विभागामार्फत राबविल्या जाव्या, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.