शहरं
Join us  
Trending Stories
1
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
2
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
3
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
4
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
5
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
6
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
7
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
8
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
9
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
10
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
11
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
12
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
13
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
14
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
15
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
16
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
17
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
18
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
19
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
20
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

जिल्ह्यातील हजारो कामगारांची नोंदणीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 1:30 AM

इमारत व इतर कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने २००७ च्या नियम ४५ मध्ये अनेक उपाययोजना केल्या. त्या योजनांचा लाभ कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी असलेल्या कामगारांनाच देण्यात येतो.

ठळक मुद्देअसंघटित कामगारांचे शोषण : बहुतांश कंत्राटदारांची नोंदणी नाही, कामगार कल्याण विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इमारत व इतर कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने २००७ च्या नियम ४५ मध्ये अनेक उपाययोजना केल्या. त्या योजनांचा लाभ कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी असलेल्या कामगारांनाच देण्यात येतो. मात्र जिल्ह्यातील बहुतांश कंत्राटदारांनी नोंदणीच केली नसल्याने त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना विविध योजनांपासून वंचित रहावे लागत आहे.जिल्ह्यात मोठ्या संख्येने छोटे-मोठे कंत्राटदार आहे. यांच्या माध्यमातून विविध कामे केली जातात. या कामांवर हजारो कामगार काम करतात. परंतु काही कंत्राटदारांनी कामगार कार्यालयाकडे नोंदणी न केल्यामुळे या कंत्राटदारांकडे काम करणारे कामगार शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.कामगार कार्यालयात कामाची नोंदणी केल्यावर त्या कामगारांचे पीएफ कपात व त्यात अर्धे पैसे आपल्यालाही टाकावे लागतील, यामुळे जिल्ह्यातील शेकडो कंत्राटदारांनी आपल्या कामाची नोंदणी कामगार कार्यालयाकडे केलीच नाही.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम करणाºया कंत्राटदारांनी १९७० च्या कामगार आयुक्त कार्यालयात नियमानुसार काम करण्यासाठी आधी कामगार कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. या संदर्भात शासनाने १९९७ मध्ये कायदाही तयार केला आहे. एका कामावर १० पेक्षा अधिक कामगार असतील किंवा १० लाखांपेक्षा अधिकचे काम करणाºया कंत्राटदारांनी आपल्या कामाची नोंदणी कामगार कार्यालयाकडे करणे गरजेचे आहे. परंतु कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांनी कामगार कायद्याला बाजूला सारून कामगारांचे शोषण करणे सुरूच ठेवले. सार्वजनिक बांधकाम विभागही कामगारांचे शोषण करण्यात अप्रत्यक्षरित्या कंत्राटदारांना सहकार्य करीत असल्याचे बोलल्या जात आहे. कामगारांसाठी शासनाने अनेक योजना अंमलात आणल्या. मात्र त्यांना राबवून घेणाºया शासकीय अधिकाºयांची अनास्थेमुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे. याहीपेक्षा ग्रामीण भागातील कंत्राटदार कामगारांचे मोठ्या प्रमाणात नोंदणी नसल्यामुळे या कामगारांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या कामगारांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देवून त्यांना लाभ मिळवून देण्याची मागणी केली जात आहे.नोंद असलेल्या कामगारांना असा मिळतो लाभकामगार कार्यालयात नोंदणी झालेल्या कामगारांच्या मजुरीतील काही रक्कम पीएफच्या खात्यात जमा होईल. त्या रकमेतील अर्धे पैसे कंत्राटदाराला जमा करावे लागतात. प्रत्येक कामगाराचा विमा असतो. आरोग्याची काळजी घेण्यासाठी हेल्थ कार्डचे वाटप केले जाते. कामगारांच्या गुणवंत मुलांना प्रोत्साहनपर बक्षीस व शिष्यवृत्ती देण्यात येते. कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस किंवा पतीस पाच वर्षापर्यंत दरमहा एक हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते. घर व घर दुरुस्तीसाठी पैसे देण्यात येतात. गंभीर आजाराच्या उपचारासाठी मदत, कामगार महिलेच्या सामान्य प्रसूतीसाठी पाच हजार व शस्त्रक्रिया प्रसूतीसाठी १० हजार रुपये व अनेक सोयी देण्यात येतात.मोजक्याच कामगारांची नोंदजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामगार असताना मोजक्याच कामगारांची नोंद केली आहे. नोंदणी असलेले हे काही कामगार रोहयोच्या कामावरी काम करतात. चंद्रपूर औद्योगिक जिल्हा असल्याने कामगारांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे, काही मोठ्या कंपन्यांमध्ये परराज्यातील कामगारांची आयात करण्यात आली आहे. या कामगारांकडे स्थानिक कागदपत्र नसल्याने तेही शासनाच्या योजनांपासून वंचित असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.