शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विषारी साप पकडल्याची वनविभागात नोंदच नाही

By admin | Updated: August 1, 2016 00:35 IST

कोणत्याही प्रजातीचा साप पकडल्यास वनविभागाकडे असलेल्या रजिस्टरमध्ये नोंद करणे नियमाप्रमाणे गरजेचे आहे.

सापाच्या तस्करीची शक्यता : वरोरा वनविभागाची सावरासावरवरोरा : कोणत्याही प्रजातीचा साप पकडल्यास वनविभागाकडे असलेल्या रजिस्टरमध्ये नोंद करणे नियमाप्रमाणे गरजेचे आहे. वरोरा शहरानजीक एका शेतातील विहिरीमध्ये विषारी साप सर्पमित्राने पकडला. परंतु वनविभागात त्याबाबत नोंद केली नाही. ही माहिती उघड होताच वरोरा वनविभागाने सावरासावर सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याविषारी सापाची तस्करी होत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येणाऱ्या येन्सा गावाच्या शेत शिवारातील विहिरीमध्ये दोन साप आढळल्याने शेतकऱ्याने सर्पमित्रास पाचारण केले. त्यातील एक साप मृत अवस्थेत आढळल्याने त्याला शेतात पुरण्यात आले तर दुसरा विषारी साप घेऊन सर्प मित्र निघून गेले. २२ जुलैची घटना असताना वनविभागाच्या रजिस्टरमध्ये नोंद कित्येक तासापर्यंत करण्यात आली नाही. याबाबत वनविभाग संपूर्णपणे अनभिज्ञ होता. ही बाब काही जागरुक नागरिकांनी उघडकीस आणताच वनविभाग जागा झाला व २२ जुलैच्या घटनेची २६ जुलै रोजी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चौकशी केली. याचा अर्थ चार दिवस नोंदी अभावी साप कुठे ठेवला, याची माहिती कळू शकली नाही.चार दिवसापर्यंत विषारी साप बाळगल्या प्रकरणी वनविभागाने कुठलीही कारवाई संबधीतावर केली नसल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)सर्पमित्राबाबत वनविभाग अनभिज्ञ वरोरा तालुक्यात किती सर्पमित्र आहेत, याची अज्ञावत माहती वनविभागाकडे दिसून येत नाही. त्यामुळे अनेक सर्पमित्र या परिसरात तयार झाले असून त्यांच्यावर वनविभागाचा अंकुश नसल्याने विषारी सापाच्या तस्करीची शक्यता वर्तविली जात आहे.विषारी साप शेतात सोडलाकुठलाही प्राणी सापडल्यास त्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वनविभाग तपासणी केल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात येते. पकडलेला विषारी साप एका शेतात सोडल्याची लेखी माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली. शेतात साप सोडल्यानंतर तो जिवंत राहिल काय, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे. साप मरणासन्न अवस्थेत होता, अशी माहिती वनविभाग देत आहे. साप चार दिवस अन्नापासून वंचित राहिल्याने तो मरणसन्न अवस्थेत होता, हे निष्पन्न होत आहे.