शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयाने काम करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 23:24 IST

चंद्रपूर जिल्ह्यातून वैनगंगा, पैनगंगा, वर्धा व इरई या मोठ्या नद्या वाहात असून या सर्व मोठ्या नद्यांवर मोठी धरणे बांधलेली आहेत. पावसाळ्यात या धरणाची पातळी वाढल्यानंतर धरणातील पाण्याचा प्रवाह सोडण्यात येत असतो.

ठळक मुद्देपूरपरिस्थितीसाठी सज्ज राहा : आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून वैनगंगा, पैनगंगा, वर्धा व इरई या मोठ्या नद्या वाहात असून या सर्व मोठ्या नद्यांवर मोठी धरणे बांधलेली आहेत. पावसाळ्यात या धरणाची पातळी वाढल्यानंतर धरणातील पाण्याचा प्रवाह सोडण्यात येत असतो. त्यामुळे या मुख्य नद्यांना पूर येऊन पूरपरिस्थिती निर्माण होऊन नदीकाठावरील गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण होतो. अशावेळी नागरिकांना मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अतंर्गत गाव, तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या बैठकीत केले.यावर्षीच्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना व आराखडा तयार करण्यासाठी मान्सूनपूर्व आढावा बैठक नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजित केली होती. त्याप्रसंगी अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन तथा निर्देश करीत असताना ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते.या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातून वाहणाºया वैनगंगा, पैनगंगा, इरई व वर्धा नदीच्या पुरामुळे ज्या गावांना धोका निर्माण होऊ शकते, अशा गावांची यादी यावेळी वाचून दाखविली. तेव्हा या गावात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास या गावातील नागरिकांना सुरक्षित व संरक्षित ठेवण्यासाठी यंत्रणेने आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच पावसाळयापूर्वी सर्व नगर परिषद क्षेत्रात व मोठया शहरातील नाल्यांची साफसफाई करण्यात येऊन नाले मोकळे करण्यात यावे. तसेच शहरातील धोकादायक असलेल्या इमारत मालकांना नोटीस देवून ते घर खाली करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशा सूचना संबंधित अधिकाºयांना त्यांनी दिल्या. तसेच विद्युत, दूरध्वनी, आरोग्य, कृषी, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, पुरवठा विभाग व पशुसंवर्धन या विभागांनी आपल्या विभागाचे नोडल अधिकारी नियुक्त करुन आपली यंत्रणा पावसाळ्यापूर्वी सुसज्ज ठेवण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सचीन कलंत्रे अधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत संवाद साधताना म्हणाले, या सर्व आपत्तीमध्ये सापडलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी गाव, तालुका, जिल्हा पातळीवर प्रशिक्षित पथके तयार करण्यात येऊन त्यांना बोटी हाताळण्याचे प्रशिक्षण पावसाळ्यापूर्वी देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.या बैठकीत सर्व विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.