शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांना जाण्यासाठी जागाच नाही जनतेचा प्रश्न 'आम्ही जायचे तरी कुठून ?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 17:26 IST

Chandrapur : वेकोली परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर दुतर्फा ट्रकांच्या रांगाच रांगा

नितीन मुसळेलोकमत न्यूज नेटवर्क सास्ती : वेकोली परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर दुतर्फा कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकांच्या लांबच लांब रांगा लावण्यात येत असल्याने अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होऊन लहान वाहने जाण्यास रस्ताच राहत नाही. त्यामुळे साहेब, तुम्हीच सांगा आम्ही जायचे कुठून, असा सवाल करीत हा महामार्ग वेकोलीसाठी की जनतेसाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राजुरा-गोवरी-पोवनी-साखरी-वरोडा या वेकोली परिसरातून जाणाऱ्या मुख्य मार्गाचे महामार्गात रूपांतर करून नवीन बांधकाम करण्यात आले. या परिसरात वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत असलेल्या विविध कोळसा खाणीतून निघणाऱ्या कोळशाची वाहतूक या मार्गावरुन केली जाते. या मार्गावर चार ठिकाणी असलेल्या वेकोलीच्या चेकपोस्टसमोर खाणीत जाणाऱ्या ट्रकांच्या मोठ-मोठ्या रांगा रस्त्याच्या दुतर्फा लावल्या जात असून अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. 

त्यामुळे या मार्गावरुन वाहतूक करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वेकोलीच्या या अवैध पार्किंगमुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. या संदर्भात अनेकवेळा तक्रारी केल्या गेल्या; परंतु वेकोली प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.

महामार्ग वेकोलीसाठी की जनतेसाठी ? महामार्ग झाल्यानंतर वेकोलीच्या कोळशाची वाहतूक करणाऱ्या शेकडो ट्रकांनी या महामार्गावर अतिक्रमण केले आहे. हे ट्रक रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना नाहक त्रास होत आहे. या महामार्गावरून परिसरातील माथरा, गोयेगांव, गोवरी, चिचोली, पोवनी, कढोली, चार्ली, निर्ली, धिडशी, साखरी, वरोडा, पेल्लोरासह अनेक गावांतील नागरिक ये-जा करतात. त्यामुळे हा महामार्ग वेकोलीच्या कोळसा वाहतुकीसाठी केला की परिस- रातील नागरिकांसाठी असा प्रश्न केला जात आहे.

अवैध पार्किंग अपघातास कारणीभूतवेकोलीच्या सास्ती, गोवरी, पोवनी व पोवनी २ या कोळसा खाणीच्या चेकपोस्टसमोर शेकडो ट्रकांच्या रांगा रस्त्याच्या दोन्ही कडेला लागत असल्याने रस्त्यावरून नागरिक, वेकोली कामगार, शालेय विद्यार्थी यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. ट्रकांची ही अवैध पार्किंग अपघाताला कारणीभूत ठरत आहे. वर्षाकाठी करोडो रुपये नफा कमविणाऱ्या वेकोली प्रशासनाने गेल्या कित्येक वर्षांपासून पार्किंगची सोय केली नाही. पोवनी २ सब एरिया कार्यालयासमोर तसेच सर्व चेकपोस्टसमोर नेहमीच ट्रक उभे असतात. ही पार्किंग धोकादायक ठरत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकchandrapur-acचंद्रपूर