शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

गडचांदूरमध्ये पाणीपट्टी करात प्रचंड वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 22:57 IST

येथील नगरपरिषदेने चालू वर्षांत पाणीपट्टी करात प्रचंड वाढ केली आहे. ही पाणीपट्टी करवाढ जिल्ह्यातील इतर नगर पालिकांच्या तुलनेत खूपच जास्त असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडेच मोडले आहे.

ठळक मुद्देनागरिकात असंतोष : करवाढ रद्द करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतगडचांदूर : येथील नगरपरिषदेने चालू वर्षांत पाणीपट्टी करात प्रचंड वाढ केली आहे. ही पाणीपट्टी करवाढ जिल्ह्यातील इतर नगर पालिकांच्या तुलनेत खूपच जास्त असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडेच मोडले आहे. पालिकेने पाणीपट्टी करात केलेली भरमसाठ वाढ रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.गडचांदूर शहरात पाण्याच्या दोन टाक्यांमधून तसेच बोअरींग मधून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. शहरात एकूण १ हजार १३० नळ कनेक्शनधारक आहेत. मात्र शहरातील बऱ्याच भागात नळाद्वारे पाणी पोहचत नसल्याची ओरड आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शहरात पाणी समस्या उद्भवत आहे.सन २०१४-१५ मध्ये पाणीपट्टी कर ७२० रुपये होता. त्यात २०१५-१६ मध्ये वाढ करुन ९०० रूपये करण्यात आला. आता यात प्रचंड वाढ करुन १५०० रूपये करण्यात आला असून पाणीपट्टी करात वाढ करण्याबाबतचा ठराव ३० जून २०१७ ला झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे.या ठरावानुसार सन २०१७-१८ मध्ये न.प. द्वारे पाणीपट्टी कर १५०० रूपये प्रमाणे वसूल केल्या जात आहे. ही वाढ अन्यायकारक असून कर तातडीने रद्द करण्याबाबत नवीन ठराव घ्यावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. ९०० रुपयांवरुन सरळ १५०० रूपये पाणीपट्टी कर केल्याने सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिंक भूर्दंड बसत आहे.पाणीपट्टी कर व गृहकर अतिशय जास्त आहे. तो कमी करण्यासाठी पालिकेने नवीन ठराव घेणे आवश्यक आहे. त्यासंबंधी पालिकेला कळविले आहे.- सचिन भोयर, गटनेते शिवसेना न.प. गडचांदूर.पाणीकर वाढविण्याचा ठराव मागील सत्तारुढ नगरसेवकांनी घेतला. त्यावेळी आम्ही विरोध केला होता. मात्र आता पाणीकर कमी करण्यासाठी नवीन ठराव घेतला जाईल.- निलेश ताजने, गटनेते,राकाँ न.प. गडचांदूर .३० जून २०१७ च्या सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार सन २०१७-१८ या वर्षाचा पाणीपट्टी कर ९०० रुपये ऐवजी १५०० रुपये करण्यात आला. याबाबत जाहीर सूचना प्रादेशिक वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतरच कर आकारणी करण्यात आली आहे.- संजय जाधव मुख्याध्यापिकारी, न.प. गडचांदूर.