शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

गावाचं नावच चुकलं! राष्ट्रीय महामार्गावरील फलकांमध्ये भल्याभल्यांच्या भूगोलाची वाट लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 15:33 IST

सुधारण्याची अपेक्षा : वाहतूकदार पडतात संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : राष्ट्रीय महामार्ग निर्मितीच्या कन्स्ट्रक्शन कंपनीने गुगलच्या आधारावर गाव नाम फलक तयार केले; परंतु गुगलने दर्शवलेले लोकेशन चुकीचे व मराठी आद्य अक्षरात असलेली घोडचूक फलकाच्या पथ्यावर पडली आहे. परिणामी, चुकीची माहिती वाहतूकदार व नवीन व्यक्तींना संभ्रमात टाकत आहे. 

कन्हाळगाव ऐवजी कन्हारगाव, चनई खुर्दच्या जागी चनई बूज, जेवरा फाटा ठिकाणी पैनगंगा नदी, कुसळऐवजी कुशल, देवघाट रिठ फाटा स्थळी कुशल, लालगुडा फाटाच्या स्थानी नांदा फाटा, तर गणेशमोड रिठ फाटा फलक दत्त मंदिर पुढे ललावण्याऐवजी लोणीजवळ लावले आहे. इजापूर गावच्या नंतर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर नसलेल्या झुलबर्डी गावाचे फलक राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आले आहे. 

अनेक ठिकाणी तर फलकच नाहीपरसोडा, गोविंदपूर, कोठोडा बूज, मेहंदी, दुर्गाडी, रुपापेठ, अकोला, जेवरा, थोपटाळा फाटा, देवघाट रिठ फाटा, लोणी, पिपर्डा, वनसडी, दहेगाव रिठ, पारंबा, सोनुर्ली, आसन, रामपूर, लालगुडा, इंजापूर, बीबी आदी गावांच्या फाट्यावर गाव फलकच लावण्यात आले नाही. राज्य सीमा, पारडी, गडचांदूर येथील मोठ्या फलकातून तालुक्याचे प्रमुख स्थान असलेल्या कोरपनाला फलकात स्थान न देता, त्या स्थानापासून महत्त्वपूर्ण नसलेल्या भोराज, गडचांदूरचे दिशादर्शन दाखवण्यात आले आहे. पारडी येथील फलकात मुकुटबनचे, नारंडा फाटा येथील फलकात चंद्रपूर, वणीचे, कुसळ फाटा येथे जिवती, पकडीगुडुम धरण, कन्हाळगाव फाटा येथे येल्लापूर, वणी बूज, गादिगुडा आदी प्रमुख स्थळाचे दिशादर्शन लावण्यात न आल्याने कमी अंतराचे मार्ग नवीन व्यक्तींना कळत नाही. यात त्यांना अधिकचे अंतर मोजून प्रवास करावा लागत आहे. या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

स्थानिक व्यक्तीला सोबत घेणे होते गरजेचेही सर्व फलके महामार्गाच्या माहिती व सौंदर्यात्मक दृष्टिकोनाने महत्त्वाची असल्याने स्थानिक व्यक्तीला सोबत घेऊन फलक तयार करणे आवश्यक होते; परंतु तसे न झाल्याने फलकांत सावळागोंधळ उडाला आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर