शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाची १२ दिवसांपासून हुलकावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 14:37 IST

Chandrapur : टी ८७ वाघाला जेरबंद करण्यासाठी १२ दिवसांपासून मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क मूल : तालुक्यात मागील दोन महिन्यांत वाघाच्या हल्ल्यात सहा जणांचा बळी गेला. त्यामुळे नागरिकांत दहशत पसरली. नागरिकांच्या मागणीनुसार, वनविभागाने टी ८७ वाघाला जेरबंद करण्यासाठी १२ दिवसांपासून मोहीम राबवत आहे. मात्र, हा वाघ हुलकावणी देत असून जेरबंद करण्याचे वनविभागाचे प्रयत्न निष्फळ ठरताना दिसत आहे.

तालुक्यात दोन वाघांनी धुमाकूळ घालत दोन महिन्यात सहा जणांचा बळी घेतला. हल्ल्यात एक गुराखी गंभीर जखमी झाला. ३० ऑक्टोबरला बोरचांदली शिवारात गुरे चराई करताना वाघाचे दर्शन होताच जीव वाचविण्याच्या आकांतात शैलेश कटकमवार याने नदीत उडी घेतली. त्यामुळे त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. परिणामी, शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण असून शेतीची कामे करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. टी ८७ वाघाला जेरबंद करण्यासाठी १२ दिवसांपासून वनविभागाने तैनात केलेल्या रेस्क्यू टीमला हुलकावणी देत आहे. ही टीम वाघाच्या मागावर आहे. परिसरात अनेक ठिकाणी वनविभागाने कॅमेरे लावले.

तालुक्यातील जंगलात ११ वाघांचा संचार आहे. वनविभागाने वाघाला तातडीने जेरबंद करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी केली. 

"दोन दिवसांपूर्वी टी ८३ वाघिणीला जेरबंद करण्यात यश मिळाले. टी ८७ वाघाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी संयम ठेवावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे." -राहुल कारेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) मूल 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर