शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाघाने महिलेला धरले जबड्यात; गावकऱ्यांनी हुसकावले पण....

By परिमल डोहणे | Updated: May 20, 2023 19:02 IST

Chandrapur News शेतात काम करताना झाडाखाली गेलेल्या महिलेला वाघाने जबड्यात धरून ठेवले. गावकऱ्यांच्या हुसकावण्याने वाघ निघून गेला मात्र ही महिला ठार झाली.

परिमल डोहणे 

चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्रातील वाघोली बुट्टी शिवारात पुन्हा वाघाने हल्ला करून एका महिलेला ठार केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. प्रेमिला मुकरू रोहणकर (५५, रा. वाघोली बुट्टी) असे मृतक महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे, वाघोली बुट्टी परिसरात वाघाने चांगलाच उच्छाद मांडला असून, २० दिवसांपूर्वी याच परिसरात वाघाने ममता बोदलकर या महिलेला ठार केले होते.

वाघोली बुट्टी येथील प्रेमिला रोहणकर ही महिला शनिवारी शेतात काम करण्यासाठी गेली. दरम्यान, त्यांना शौचास लागल्याने त्या रस्त्यावरील एका झाडाखाली गेल्या. तिथेच वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांची आरडाओरड ऐकून दोन महिलांनी तिथे जाऊन बघितले असता वाघाने प्रेमिला यांना तोंडात पकडून ठेवले होते. त्यांनी घाबरून एकच आरडाओरडा केला. तेव्हा आजूबाजूला शेतात कामावर असणारे ५० ते ६० जण धावत आले. तरीही त्या वाघाने महिलेला तोंडातच पकडून ठेवले होते. काही वेळाने त्याने महिलेला तिथेच टाकले व पळून गेला. विशेष म्हणजे, शुक्रवारीही याच गावातील दोघे वाघाच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचले होते. पण, एक बकरी मारली गेली होती. घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिस विभाग घटनास्थळी गेले.

यापूर्वीही झाले वाघाचे हल्लेयापूर्वीही वाघाने याच परिसरात हल्ले चढविले आहेत. पत्रुजी भांडेकर यांच्यावर हल्ला केला आणि त्याच्या चार शेळ्या मारल्या. राजू गव्हारे यांच्यावरही हल्ला करीत जखमी केले, यावेळी त्यांची एक शेळी मारली. महेंद्र मेश्राम यांच्यावर हल्ला करून जखमी केले. भिकाजी गव्हारे यांची १ शेळी मारली, तर २० दिवसांपूर्वी ममता बोदलकर यांच्यावर हल्ला करून ठार केले. शनिवारी प्रेमिला रोहणकर मारल्या गेल्या.

टॅग्स :Tigerवाघ