शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' गावांच्या पुनर्रचनेने कोरपना तालुक्यातील राजकीय समीकरणात होणार बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 18:37 IST

Chandrapur : बिबी-वनसडीत, तर बाखर्डी, तळोधी आवाळपुरात

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रारूप पुनर्रचनेमुळे कोरपना तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. एक नवीन जिल्हा परिषद गट व दोन नवीन पंचायत समिती गणांची भर झाल्यामुळे अनेक गावांची गटांमध्ये फोडतोड करण्यात आली आहे. परिणामी, याचे थेट परिणाम तालुक्यातील राजकीय समीकरणांवर आणि स्थानिक नेतृत्वाच्या गणितांवर होत आहेत.

बिबी गाव आता वनसडी-कोडशी - बूज. जिल्हा परिषद गटात समाविष्ट करण्यात आला असून बाखर्डी व तळोधी ही दोन्ही गावे आवाळपूर-भोयगाव गटात समाविष्ट करण्यात आले आहे. वनसडी व आवाळपूर हे दोन्ही नवीन पंचायत समिती गण म्हणून घोषित करण्यात आल्याने कार्यकर्ते संधीचे सोने करण्याच्या तयारीत लागले आहे. अनेक गावांचा नव्या गणांमध्ये समावेश झाल्याने राजकीय कार्यकर्त्यांच्या मतदारसंघांचा चेहरामोहराच बदलला आहे.

गट पुनर्रचना राजकीय परिणाम करणारी ठरणारही गट-गण पुनर्रचना निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा परिणाम करणारी ठरणार आहे. अनेक इच्छुक उमेदवारांचे कार्यक्षेत्र दुसऱ्या गटात गेले आहे. त्यामुळे नवीन मतदारसंघांत पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे लागणार आहे.

परंपरागत वर्चस्व असलेल्या नेत्यांना नवीन आव्हान पंचायत समिती गणांची अदलाबदल झाल्याने व पुनर्रचनेत वेगवेगळी गावे समाविष्ट झाल्याने परंपरागत वर्चस्व असलेल्या नेत्यांसमोर नवीन आव्हान निर्माण झाले आहे. एकूणच या बदलामुळे गटनिहाय सत्ता-समीकरणे पूर्णतः नव्याने मांडली जाणार आहेत.

निवडणुकीत राहणार चुरसबिबी-वनसडीत तर बाखर्डी, तळोधी आवाळपुरात समाविष्ट झाले. अशाप्रकारे गावांची पुनर्बाधणी झाल्याने कोरपना तालुक्यात राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवर नवे समीकरण उभे राहत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत याचे पडसाद निश्चितपणे उमटणार असून, चुरस अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत.

नवीन नेतृत्व उभे राहण्याची शक्यतादोन पंचायत समिती गण व एक जिल्हा परिषद गट नव्याने निर्माण झाल्याने नवीन नेतृत्व उदयास येण्याची संधी निर्माण झाली आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर