शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

साहेब, ११ हजार रुपये असलेला कापसाचा भाव सात हजारांवर आला ना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 13:20 IST

कापसाच्या दरात घसरण : तीन वर्षांपूर्वी मिळाला ११ हजार रुपये भाव

आशिष खाडे लोकमत न्यूज नेटवर्क पळसगाव : दिवसागणिक शेतकऱ्यांच्या उपयोगी साहित्यांसह बी- बियाणे, खते, औषधी, मजुरी आदींच्या दरात कमालीची वाढ होताना दिसत आहे; परंतु त्याच मातीतून उगवणार पांढऱ्या सोन्याचे भाव गडगडताना दिसत आहे. तीन वर्षांपूर्वी कापसाला दहा हजारांच्या पलीकडे भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत होता; पण आजच्या घडीला कापसाचे चढलेले भाव चक्क चार हजारांनी उतरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

खरीप हंगामामध्ये मुख्य पीक म्हणून शेतकरी सोयाबीन, तूर, धान पिकांसोबत कापूस पिकांची बहुतांश शेतकरी लागवड करतात. कापूस पिकाला सहा महिन्याचा कालावधी असून उत्पादन क्षमता आता त्यात दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आता काहीच उरत नाही आहे. 

कापूस पिकाला तीन वर्षांअगोदर नऊ हजारांपासून ते साडेअकरा हजार रुपयांपर्यंत चांगला भाव मिळत होता. भाव बऱ्यापैकी मिळत असल्यामुळे उत्पादन खर्च निघून काही पैसे शेतकऱ्यांना शिल्लक राहत होते; पण मागील दोन वर्षांपासून कापसाच्या दरात कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. 

त्यामुळे आता दिवसेंदिवस कापूस पिकाची शेती ही तोट्यात जात आहे. कापूस पिकाला ७५२१ रुपये शासनाने हमीभाव ठरवून दिलेला आहे; परंतु अद्यापही शेतकऱ्यांचा कापूस या हमीभावाने घेतल्याचे दिसून आले नाही. सात हजार रुपयांपासून बाजार मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात आहे. 

एवढ्या भावामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्यामुळे समोरील हंगामासाठी पैशाची तरतूद कुठून करायची, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे. 

"शासनाच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा पोकळ ठरल्या आहेत. उलट शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही; पण कापसाचा ११ हजार रुपयांवर गेलेला भाव आज सात हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे." -पद्माकर देरकर, शेतकरी, पळसगाव

"एक एकरमध्ये १६ हजार रुपयांचे सोयाबीन झाले. त्यात २० हजारांचा खर्च आला. सोयाबीनला जर सात हजार रुपये हमीभाव असता तर किमान खर्च तरी माझा निघाला असता." - सूरज पोतराजे, शेतकरी, पळसगाव.

शेतकरी धोरणात हवाय बदल मागील दहा वर्षांच्या काळात शेतमालाच्या हमीभावात शासनाने भाववाढ केली असली, तरीही भाववाढ उत्पादनखचर्चापेक्षा कमीच आहे. खासगी बाजारात मालाचे भाव हमीभावापेक्षा कमीच राहत आहेत. त्यावर शासनाचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडत चालली आहे. शेतमालाचे भाव आणि इतर वस्तूंची झालेली भाववाढ यामध्ये कमालीची तफावत आढळून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या आयुष्यात काळोख दिवसेंदिवस निर्माण होत आहे. मागील दहा वर्षांच्या काळात ज्याप्रमाणे खताचे भाव वाढले, त्याच तुलनेत जर शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाचे भाव जर वाढवून दिले तरच शेतकरी आर्थिक सक्षम होईल.

टॅग्स :cottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीchandrapur-acचंद्रपूर