शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मासाेळीने छातीवर शेपटी मारल्याने मासेमाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2023 20:40 IST

Chandrapur News मासेमारी करताना मोठ्या मासोळीने तुकाराम कोडापे यांच्या छातीवर जोरदार प्रहार केला. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देमासोळीचा छातीवर जोरदार प्रहार

चंद्रपूर : आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी सातारा येथील तुकाराम कोडापे (७०) अनेक वर्षांपासून मच्छीमारी करून आपल्या परिवाराचे पालनपोषण करीत होते. मात्र हयातभर रोजी-रोटी देणाऱ्या मच्छीनेच कोडापे यांचा घात केला. मासेमारी करताना मोठ्या मासोळीने तुकाराम कोडापे यांच्या छातीवर जोरदार प्रहार केला. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

चिमूर तालुक्यातील सातारा येथील वाल्मिकी मच्छीमार संस्थेचे सदस्य तुकाराम कोडापे गावाशेजारी असलेल्या टेकेपार येथील मामा तलावात नेहमीप्रमाणे सहकाऱ्यांसोबत मासेमारीसाठी गेले. नेहमीप्रमाणे तुकाराम व सहकारी मच्छी पकडण्यासाठी तलावात उतरले. दरम्यान मच्छीमारी करीत असताना मोठ्या मासोळीने तुकाराम यांच्या छातीवर जोरदार प्रहार केला. छाती दुखत असल्याने सहकाऱ्यांनी तुकाराम यांना तलावाच्या काठावरील त्यांच्या झोपडीत आणून छातीला बाम लावून दिला. मात्र, काही वेळातच त्यांनी हालचाल बंद केली. पोलीस पाटील यांच्या मदतीने चिमूर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तुकाराम यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेचा तपास ठाणेदार मनोज गभणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भीष्मराज सोरते करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यू