शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरची जीवनदायीनी इरई नदीचे रूपडे पालटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, इरईचे खोलीकरण, सौंदर्यीकरण व संवर्धन करण्यासाठी  पालकमंत्री वडेट्टीवार हे सतत पाठपुरावा करीत आहेत. शासनही यासाठी सकारात्मक आहे. पहिल्या टप्प्यात नदीचे पात्र मोकळे केले तर पाणी कुठे थांबते, कुठून निघून जाते, पूर परिस्थिती कशामुळे निर्माण होते, या बाबींचा अंदाज येईल. त्यामुळे नदीचा गाळ काढून खोलीकरण करणे आवश्यक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इरई नदी चंद्रपूर शहराला सुमारे सात किलोमीटर समांतर वाहते. नदीचे पात्र रुंद झाल्याने पावसाळ्यात अनेकदा पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रशासनाने पहिल्या टप्प्यात तत्काळ उपाययोजना म्हणून नदीच्या खोलीकरणाचे काम सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे आढावा बैठकीत दिले. या निर्णयामुळे चंद्रपूरची जीवनदायीनी इरई नदीचे रूपडे पालटण्याची आशा निर्माण झाली आहे.यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली  सेठी, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, बांधकाम अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, पद्माकर पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, कार्यकारी अभियंता एस.बी. काळे, कुंभे, उपविभागीय अभियंता दि. ना. मदनकर सहभागी झाले होते.उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, इरईचे खोलीकरण, सौंदर्यीकरण व संवर्धन करण्यासाठी  पालकमंत्री वडेट्टीवार हे सतत पाठपुरावा करीत आहेत. शासनही यासाठी सकारात्मक आहे. पहिल्या टप्प्यात नदीचे पात्र मोकळे केले तर पाणी कुठे थांबते, कुठून निघून जाते, पूर परिस्थिती कशामुळे निर्माण होते, या बाबींचा अंदाज येईल. त्यामुळे नदीचा गाळ काढून खोलीकरण करणे आवश्यक आहे. या कामासाठी विदर्भ सिंचन महामंडळाकडील मशीन  दिल्या जातील. जिल्हा नियोजन समितीतून डिझेलसाठी निधीची तरतूद करावी. जेणेकरून कामाला तत्काळ सुरुवात होईल. पुढील वर्षी इरई नदीच्या संवर्धनासाठी अतिरिक्त निधी देऊ, अशी ग्वाही ना. पवार यांनी दिली.

इरईसाठी जादा निधी द्यावा- विजय वडेट्टीवार - इरई नदीचे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण, संवर्धन, बंधारे व विकासासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. - पूरप्रतिबंधासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागातून निधी देऊ; मात्र गॅबियन बंधाऱ्यासाठी जलसंपदा विभागाने निधी द्यावा, अशी मागणीही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी बैठकीत केली.

ग्रीन बिल्डिंग संकल्पनेवर वढा तीर्थक्षेत्राचा विकास

- वर्धा व पैनगंगा संगमावरील वढा हे ‘ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्र होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव आहे. ग्रीन बिल्डिंग संकल्पनेवर या तीर्थक्षेत्राचा विकास होईल. त्यासाठी जांभा दगडाचा वापर केला जाईल.- कामांसाठी ४४ कोटी प्रस्तावित आहे. दोन वर्षांत २५ कोटी दिल्यास उर्वरित निधी खनिज विकास निधी व नियोजन समितीतून देता येईल. - वढा येथे ‘प्रति पंढरी’ साकार करू, असेही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी बैठकीत सांगितले.

५७२ कोटींचा इरई विकास आराखडा- स्वच्छता व खोलीकरणासाठी (१७ किमी.) - २५ कोटी- डाव्या किंवा उजव्या बाजूने एक किमी सौंदर्यीकरण- २०० कोटी- दाताळा पुलाखालील २२८ मीटर लांबीचा बंधारा - २० कोटी- डाव्या व उजव्या तिरावरील संरक्षक भिंत- ३२० कोटी- इरई नदीशी संबंधित इतर विकासकामे- ७ कोटी 

 

टॅग्स :riverनदी