शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

४० वर्षांपासून प्रलंबित जमिनीचा प्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 05:00 IST

ब्रह्मपुरीत प्रशासन स्थिरावण्यासाठी १९ कोटी खर्चून करून अधिकारी - कर्मचारी निवासस्थानाचे भूमिपूजन केले. उद्यान व जलतरण तलावासाठी ९ कोटी, क्रीडा संकुलासाठी ८ कोटी दिले. पं. स. इमारतीसाठी १४ कोटी मंजूर आहे. १०० बेड्सचे रुग्णालय  होत असून पुन्हा १२ कोटी आयसीयू बेडसाठी मिळाल्याची माहिती ना. वडेट्टीवार यांनी दिली. कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत नानाजी सावरकर, शोभा सोनटक्के, जीजा पारधी, विद्या ठाकरे व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील माया पारधी यांना धनादेश देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरीतील  ४० वर्षांपासून शारदा कॉलनीचा प्रलंबित असलेल्या कायमस्वरूपी पट्ट्याचा प्रश्न पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नामुळे कायमचा सुटला आहे. पात्र ४२ कुटुंबांना शनिवारी पट्ट्यांचे प्रमाणपत्र वाटप केले. इतर ठिकाणी अतिक्रमणधारकांनाही पट्टे वाटप करू, अशी ग्वाही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी महाराजस्व अभियानात दिली.यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, एसडीपीओ मिलिंद शिंदे, कार्यकारी अभियंता हेमंत कोठारी, तहसीलदार उषा चौधरी, प्रभाकर सेलोकर, खेमराज तिडके, विलास विखार, प्रा. जगनाडे उपस्थित होते.  पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, समाजातील सर्व जाती-धर्मांच्या लोकांना न्याय देण्याची महाराजांची भूमिका होती. याच संकल्पनेवर राज्य शासन काम करत आहे. ब्रह्मपुरीत प्रशासन स्थिरावण्यासाठी १९ कोटी खर्चून करून अधिकारी - कर्मचारी निवासस्थानाचे भूमिपूजन केले. उद्यान व जलतरण तलावासाठी ९ कोटी, क्रीडा संकुलासाठी ८ कोटी दिले. पं. स. इमारतीसाठी १४ कोटी मंजूर आहे. १०० बेड्सचे रुग्णालय  होत असून पुन्हा १२ कोटी आयसीयू बेडसाठी मिळाल्याची माहिती ना. वडेट्टीवार यांनी दिली. कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत नानाजी सावरकर, शोभा सोनटक्के, जीजा पारधी, विद्या ठाकरे व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील माया पारधी यांना धनादेश देण्यात आला. सर्वांसाठी घरे अंतर्गत रवींद्र देशमुख, युवराज बगमारे, पुष्पा गेडाम, मनोहर मेश्राम यांना, न. प. क्षेत्रातील जीजा चाफले, सुषमा भेदरे, मंदा बोरकर यांना प्रमाणपत्र तर प्राधान्यकुटुंब योजनेंतर्गत जया करबे, वैशाली प्रधान, तेजस्विनी दलाल यांना शिधापत्रिका वाटप केले. प्रास्ताविक तहसीलदार उषा चौधरी व संचालन नरेश बोधे यांनी केले. राऊत यांनी आभार मानले.

तीन हजार महिलांना रोजगार- ब्रह्मपुरीत  छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १५ फूट उंचीचा पुतळा उभारण्यासाठी दीड कोटी खर्च करू. पाणी पुरवठा योजना व १०० कोटींची भूमिगत गटार योजना प्रस्तावित आहे. गारमेंट क्लस्टरद्वारे तीन हजार महिलांना येथे रोजगार उपलब्ध होत आहे, असेही ना. वडेट्टीवार यांनी सांगितले.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार