शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

लाडकी बहीण योजना निरंतर सुरू राहणार; सरकार पुन्हा आल्यानंतर रकमेत वाढ करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 14:38 IST

सुधीर मुनगंटीवार : बल्लारपुरात रक्षाबंधन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : आर्थिकदृष्ट्या मागे पडलेल्या महिलांकरिता राज्य शासनाने सुरू केलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या महिन्याला १ हजार ५०० रुपये देणाऱ्या योजनेचा अर्ज भरण्याच्या मदतीची चिंता करू नका. ही प्रक्रिया निरंतर सुरू राहील. राज्यात आमचे सरकार पुन्हा आल्यानंतर रकमेत आणखी वाढ करून ती ३ हजार रुपये करू. महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे हाच योजनेचा हेतू आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मंगळवारी (दि. २०) गांधी पुतळ्याजवळ 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजप जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष वैशाली जोशी, विद्या देवाळकर, सारिका कणकम, शुभांगी शर्मा, जयश्री मोहुर्ले, सुवर्णा भटारकर, आरती आक्केवार, किरण दुधे, कांता ढोके आदी उपस्थित होते. ना. मुनगंटीवार म्हणाले, लाडकी बहीण योजनेची उपयुक्तता व मिळत असलेला प्रतिसाद उत्तम आहे. महिलांच्या आरोग्यासाठी शिबिर घेण्यात येईल. आवास योजनेतून मिळणाऱ्या घरांच्या नावावर तसेच नझुल पट्ट्यांवर पुरुषांसोबत त्यांच्या पत्नीचे नाव असेल. महिलांच्या हक्क व उन्नतीसाठी शासनाच्या नवनवीन योजना असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक वैशाली जोशी यांनी केले तर सूत्रसंचालन मोहुर्ले यांनी केले.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर