शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वयोमर्यादेमुळे 'त्या' बेरोजगार युवकांचे प्रशिक्षणार्थी शिक्षक बनण्याचे स्वप्न भंगले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 15:00 IST

Chandrapur : वयोमर्यादेत वाढ करण्याची युवकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क मूल : शासनाने 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' सुरू केली असून या योजनेअंतर्गत जिल्हा परिषद प्रशासन लगबगीने कार्यवाही करून जिल्हा परिषद शाळांवर बेरोजगारांमधून प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून नियुक्ती देणार आहे. त्यासाठी डी.एड. व बी.एड. पदविका प्राप्त युवकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मात्र, यामध्ये केवळ १८ ते ३५ वयोगटाची मर्यादा असल्याने ३५ वर्षांवरील बेरोजगार युवकांचे प्रशिक्षणार्थी शिक्षक बनण्याचे स्वप्न भंगले आहे.

त्यामुळे शासकीय नोकर भरतीमध्ये मगासावर्गीयांना असलेली वयोमर्यादा याही योजनेत लागू करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार युवकांकडून केली जात आहे. युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी शासनाने 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' सुरू केली आहे. बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग व जिल्हा परिषद प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावर अहर्ताधारक उमेदवारांना प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

मात्र, वयाची १८ ते ३५ वयोगटाची मर्यादा असल्याने मागील अनेक वर्षांपासून डी.एड. व बी.एड. पदविका प्राप्त करून नोकर भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या व ३५ वर्षांवरील अनेक बेरोजगार युवकांच्या प्रशिक्षणार्थी शिक्षक बनण्याच्या आशेवर पाणी फेरले आहे. त्यामुळे शासकीय नोकर भरतीत ज्या प्रमाणे मागासवर्गीय उमेदवारांना वयाची सूट दिली जाते, त्याच प्रमाणे या योजनेमध्येही अशी सूट लागू करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार युवकांकडून केली जात आहे. 

"वर्ष २००८ मध्ये डी.एड. पूर्ण झाले. तेव्हापासून केवळ एकदाच शिक्षक भरती घेण्यात आली. त्यानंतर एकदाही शिक्षक भरती झाली नाही. त्यामुळे वय वाढत गेले. शासनाने शासकीय नोकर भरतीमध्ये मागासवर्गीयांना असलेली वयाची मर्यादा 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' यामध्ये लागू करावी. जेणेकरून आम्हाला प्रशिक्षणार्थी शिक्षक बनण्याची संधी मिळेल." - लीलाधर गुरुनुले, डी.एड. पदविकाधारक युवक

"माझे बी.एड. पूर्ण झाले आहे. मात्र, शिक्षक भरती न झाल्याने माझे वय वाढले आहे. शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना'मध्ये वयाची कालमर्यादा वाढवावी, जेणेकरून प्रशिक्षणार्थी शिक्षक तरी बनण्याचे स्वप्न पूर्ण होईल."- विनोद जीवतोडे, बी.एड. पदवीधारक युवक 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाchandrapur-acचंद्रपूर